Baba Vanga Prediction : कोरोना पुन्हा डोकं वर काढणार? बाबा वेंगा नाही, जपानच्या या व्यक्तीची भविष्यवाणी काय?
Corona Pandemic : 2020 मध्ये जगावर कोरोनाचे संकट आले होते. त्यावेळी जग जणू ठप्प झाले होते. रुग्णालयात मोठी गर्दी होती. या संसर्गजन्य रोगाने अनेकांना घरातच कोंडले होते. आता जपानच्या या व्यक्तीने मोठं भाकीत केलं आहे.

2020 मध्ये जगात कोरोनाने हाहाकार केला होता. जगाची गती एकदम थांबली. या रोगाचा संसर्ग झपाट्याने झाला. या काळात रुग्णालयात मोठी गर्दी होती. या संसर्गजन्य रोगाने अनेकांना घरातच कोंडले होते. त्याकाळच्या परिस्थितीने आजही अनेकांच्या काळजाचा आजही थरकाप उडतो. अनेकांनी त्यांच्या स्वकीयांना गमावले. तर जवळचे मित्र जगाचा निरोप सोडून गेले. आता असाच संसर्गजन्य रोग जगाची नाकाबंदी करणार असल्याचा दावा एका भविष्यवेत्त्याने केला आहे. जपानमधील या व्यक्तीने हा दावा केला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने यापूर्वी 2020 मधील कोरोनाविषयी सुद्धा भाकीत केले होते.
काय आहे दावा?
Japan Today नुसार, रियो तात्सुकी यांनी वर्ष 1999 मध्ये ‘भविष्य जसे मी पाहतो’, या शीर्षकाखाली एक कॉमिक लिहिले होते. त्यात त्यांनी वर्ष 2020 मध्ये जगात हाहाकार करणाऱ्या या व्हायरसची भविष्यवाणी केली होती. त्यांनी याविषयीची माहिती दिली होती. त्यात 2020 मध्ये एप्रिल महिन्यात हा संसर्गजन्य रोग जगाला वेठीस धरेल, असे भाकीत केले होते.




10 वर्षानंतर कोरोना संकट
10 वर्षानंतर कोरोना संकट पुन्हा जगावर येईल, असे भाकीत जपानी भविष्यवेत्ता रियो तात्सुकी याने केले आहे. त्याच्या माहितीनुसार, 2020- 2021 मध्ये कोरोना महामारीचा प्रकोप वाढेल, डेल्टा व्हेरिएशनमुळे अनेकांचे प्राण जातील असे त्यांनी भाकीत केले होते. तर त्यानंतर ही संसर्गजन्य आजार पुन्हा 10 वर्षानंतर डोके वर काढेल असे भाकीत त्यांनी केले आहे. त्यानुसार 2030 मध्ये हा आजार पुन्हा जगाला वेठीस धरेल. त्यांच्या कॉमिक्स मालिकेत त्यांनी याविषयीचे भाकीत केले आहे. पण ही भविष्यवाणी खरी ठरणार का? असा सवाल करण्यात येत आहे.सध्या जगभरात इबोला, खसरा, MPOX आणि H5N1 एव्हियन फ्लू यावेळी काही भागात धोकादायक आहे. पण रियो तात्सुकी यांची भविष्यवाणी खरी ठरते की तिचे टायमिंग चुकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोता आधारे ही माहिती देण्यात आली आहे. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.