शाहरुख सारखा थाट, शाहरुख सारखा पैसा! या मूलांकाचे लोक सर्वात नशीबवान; तुमचा मूलांक काय?

या मूलांकाच्या लोकांच्या आयुष्यात उत्तम पैसा कमावण्याचे योग असतात. हे लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात माहीर असतात, ज्यामुळे त्यांनी गुंतवणूक केलेल्या ठिकाणी किंवा व्यवसायात त्यांना चांगला परतावा (Return) मिळतो

शाहरुख सारखा थाट, शाहरुख सारखा पैसा! या मूलांकाचे लोक सर्वात नशीबवान; तुमचा मूलांक काय?
Shahrukh Khan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 20, 2026 | 5:18 PM

अंकशास्त्रानुसार (Numerology), काही विशिष्ट मूलांक असलेल्या व्यक्तींना आयुष्यात भरभरून प्रसिद्धी आणि यश मिळते. त्यांच्याकडे पैशांची कधीच कमतरता भासत नाही. इतकेच नाही तर समाज आणि कामाच्या ठिकाणी लोक त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मूलांकही हाच असून, या मूलांकाच्या लोकांचे नशीब कसे असते, यावर नजर टाकूया…

अंकशास्त्रात व्यक्तीची जन्मतारीख तिचे गुण, स्वभाव आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगून जाते. जन्मतारीख जोडल्यानंतर जो अंक मिळतो, त्याला ‘मूलांक’ म्हटले जाते.

मूलांक २ वर असतो चंद्राचा प्रभाव

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा जन्म २ नोव्हेंबर रोजी झाला आहे. त्यामुळे त्याचा मूलांक २ आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ या तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक २ असतो. मूलांक २ असलेल्या जातकांवर ‘चंद्र’ ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. यामुळे हे लोक स्वभावाने थोडे भावुक असतात, पण आयुष्यात प्रचंड यश मिळवतात.

शांत स्वभाव आणि कल्पकतेची (Creativity) खाण

मूलांक २ चे लोक अतिशय शांत, संयमी आणि समजूतदार असतात. ते इतरांचे म्हणणे अगदी काळजीपूर्वक ऐकून घेतात आणि नातेसंबंध जपण्यात पटाईत असतात. या लोकांमध्ये उपजतच कल्पकता (Creativity) खूप जास्त असते. यामुळेच हे लोक कला, चित्रपट, संगीत, लेखन किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे आणि मोठे नाव कमावतात. शाहरुख खानप्रमाणेच हे लोकही सर्वसामान्यांच्या हृदयात हक्काचे स्थान निर्माण करतात.

आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि संवादकौशल्य

मूलांक २ च्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते. त्यांची बोलण्याची शैली आणि चेहऱ्यावरील हास्य लोकांना सहज आपलेसे करून घेते. शाहरुख खानप्रमाणेच हे लोक जनसमुदायासमोर किंवा जाहीर व्यासपीठावर स्वतःला खूप चांगल्या प्रकारे सादर करू शकतात. मग ते चित्रपट क्षेत्र असो, व्यवसाय असो वा इतर कोणतेही क्षेत्र, त्यांच्या कष्टाला नक्कीच फळ मिळते.

धनलाभ आणि अफाट संपत्तीचे योग

या मूलांकाच्या लोकांच्या आयुष्यात उत्तम पैसा कमावण्याचे योग असतात. हे लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात माहीर असतात, ज्यामुळे त्यांनी गुंतवणूक केलेल्या ठिकाणी किंवा व्यवसायात त्यांना चांगला परतावा (Return) मिळतो. आज शाहरुख खान जगभर प्रसिद्ध आहे आणि त्याची संपत्तीही अफाट आहे. अगदी त्याचप्रमाणे मूलांक २ चे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर अमाप संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवतात.

जर मूलांक २ असलेल्या लोकांना शाहरुख खानसारखे शिखर गाठायचे असेल, तर त्यांनी खालील गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे:

-आपल्यातील अंगभूत कला आणि कल्पकतेला (Creativity) अधिक वाव द्या.

-कोणत्याही कामात घाईगडबड न करता संयम राखायला शिका.

-स्वभावाने भावुक असल्यामुळे अनेकदा चुकीच्या संगतीमुळे नुकसान होऊ शकते, म्हणूनच भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. उत्तम नातेसंबंधच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातींल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us