
हिंदू धर्मातील शास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या पुढील पिढीला भोगावी लागतात, यालाच पितृदोष असे म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात, त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. आता हा दोष कसा ओळखायचा, तो का होतो आणि ते दूर करण्यासाठी उपाय काय? हे आपण जाणून घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली त्याच्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीची कुंडली ज्योतिषाला दाखवून, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांबद्दल माहिती मिळवता येते. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग असतात. कुंडलीत तयार होणाऱ्या शुभ योगांमुळे त्या व्यक्तीचे जीवन आनंदी होते. त्यांना पैशाची आणि अन्नाची कमतरता नाही. तसेच या व्यक्तींना थोड्याशा कष्टाने यश मिळते. पण जर कुंडलीत अशुभ योग असेल तर मात्र त्या व्यक्तीला जीवनात असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते.
आज आम्ही तुम्हाला कुंडलीतील पितृ दोषाबद्दल सांगणार आहोत. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असतो. त्यांना पैशाचे नुकसान, आजारपण, कौटुंबिक अडचणी आणि इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
जेव्हा सूर्य, मंगळ आणि शनी एखाद्या व्यक्तीच्या लग्न म्हणजे पाचव्या घरात असतो, तेव्हा पितृदोष येतो. याशिवाय, आठव्या घरात गुरु आणि राहू एकत्र असेल तरीही पितृदोष निर्माण होतो. जन्मकुंडलीत राहू मध्यभागी किंवा त्रिकोणात असेल तरी पितृदोष असल्याचे मानले जाते. तसेच, जर सूर्य, चंद्र आणि लग्नेश यांचा राहूशी संबंध असेल तर त्या व्यक्तीला पितृदोषाचा सामना करावा लागतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)