Pitru Paksha 2026: कुठल्या दिशेला कराल श्राद्ध, तर्पण आणि दान, पितृपक्षाआधी करा नोट

Pitru Paksha 2026: पितृपक्षाला हिंदू धर्मात फार मोठं महत्त्व आहे. काही कुटुंबिय तर, पितृपक्षासाठी ब्राह्मण बोलावतात. पण काही घरीत पितृपक्ष करतात. पण यासाठी योग्य दिशा माहिती असणं फार गरजेचं असते... यावेळी दक्षिण-पश्चिम दिशाला अधिक प्राधान्य दिलं जातं..

Pitru Paksha 2026: कुठल्या दिशेला कराल श्राद्ध, तर्पण आणि दान, पितृपक्षाआधी करा नोट
Pitru Paksha 2026
| Updated on: Sep 08, 2026 | 3:14 PM

Pitru Paksha 2026: हिंदू धर्मात पितृपक्षाला फार मोठं महत्त्व आहे. आपल्या कुटुंबातील ज्या सदस्यांचं निधन झालं, त्यांचं पूजन करणं म्हणजे पितृपक्ष… समोर येत असलेल्या महितीनुसार, सप्टेंबर महिन्यात पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. पितृपक्षात लोक कुटुंबातील दिवंगत पूर्वजांच्या निधनाच्या विशिष्ट तिथीनुसार श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मणभोजन यांसारखे धार्मिक विधी करतात. याला वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व दिल जात; विशेषतः, पूर्वजांच्या नावाने अन्न अर्पण करण्यासाठी आणि त्यांचे फोटो ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा योग्य मानली जाते.

अनेक कुटुंबं पितृपक्षात ब्राह्मणांना सन्मानपूर्वक घरी आमंत्रित करतात. त्यानंतर, त्यांना आदरपूर्वक भोजन दिले जातं आणि वस्त्र, दक्षिणा व इतर वस्तू भेट देखील दिल्या जातात. या विधींसाठी घराच्या नैऋत्य दिशेला प्राधान्य दिलं पाहिजं. योग्य दिशेला पितरांशी संबंधित विधी केल्याने त्यांच्याबद्दलची आदरभावना दृढ होते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होतं, असं देखील मानलं जातं.

पितृपक्षासाठी कोणती दिशा योग्य…

घराची नैऋत्य दिशा ही पितरांचं स्थान मानली जाते. ही दिशा पृथ्वी तत्त्वाशी संबंधित आहे, जे स्थिरता, सामर्थ्य आणि भक्कम पाया यांचं प्रतीक आहे. याच कारणामुळे, पितरांशी संबंधित बाबींमध्ये नैऋत्य दिशेला विशेष फार महत्त्व आहे; जर घराच्या या भागात पुरेशी जागा उपलब्ध असेल, तर पितृपक्षात येथे ‘ब्राह्मण भोजा’ची व्यवस्था केली जाऊ शकते.

पूर्वजांचे फोटो कुठे लावावे?

पूर्वजांच्या फोटोंसाठी नैऋत्य दिशा योग्य मानली जाते. घरात या दिशेला पूर्वजांचे फोटो लावल्यान कुटुंबाला पूर्वजांचा आधार आणि आशीर्वाद मिळत राहतात.आताच्या घरांबद्दल सांगायचं झालं तर, घरांमध्ये जागा मर्यादित असते. जर ‘ब्राह्मण भोजा’साठी नैऋत्य दिशेला पुरेशी जागा नसेल, तर दक्षिणेपासून पश्चिमेच्या सुरुवातीच्या भागापर्यंत उपलब्ध असलेल्या जागेचा वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारे, घराच्या रचनेनुसार योग्य ती व्यवस्था करून पूर्वजांच्या नावाने भोजन दिलं जाऊ शकतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us