AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayaka Chaturthi 2026: गणरायाची मूर्ती खरेदी करताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा…

Vinayaka Chaturthi 2026: काही दिवस शिल्लक राहिले आहेत, लवकरच गणरायाचं आगमन होणार आहे. पण गणरायाची मुर्ती खरेदी करताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा.. तर जाणून घ्या कोणती आहे ती गोष्ट...

Vinayaka Chaturthi 2026: गणरायाची मूर्ती खरेदी करताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा...
Vinayaka Chaturthi
| Updated on: Sep 08, 2026 | 4:01 PM
Share

Vinayaka Chaturthi 2026: आता प्रत्येकाला 14 सप्टेंबरची प्रतिक्षा आहे. कारण सोमवारी गणरायाचं घरात आगमन होणार आहे. काहींच्या घरात दीड, तर काहीच्या घरी पाच, सात आणि दहा दिवसांसाठी बाप्पा येणार आहे. घरात गणपतीची स्थापना झाल्यानंतर, योग्य विधींनी त्यांची पूजा केल्यानंतर, दहाव्या दिवशी गणरायाचं विसर्जन केलं जातं. गणेश चतुर्थीच्या वेळी, लोक गणपतीच्या नवीन मूर्ती खरेदी करून त्यांची घरात स्थापना करतात. जसं घरात गणपतीची स्थापना आणि पूजा करण्याचे नियम आहेत, त्याचप्रमाणे त्यांची मूर्ती खरेदी करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. जर तुम्हीसुद्धा या गणेश चतुर्थीसाठी नवीन मूर्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गणपतीची मूर्ती खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते पाहूया.

गणेशाची मूर्ती कशी असावी?

सोंडेची दिशा: गणपतीची सोंड डावीकडे वळलेली असावी. हे सुख, समृद्धी आणि शांती दर्शवते. उजवीकडे सोंड असलेल्या मूर्तींसाठीचे नियम खूप कडक आहेत. त्यामुळे कधीही डाव्या सोंडेचा गणपती घ्या.

आसन: बसलेल्या अवस्थेतील गणेशाची मूर्ती घरात स्थिरता आणते आणि ती नेहमीच शुभ मानली जाते. उभ्या अवस्थेतील गणेशाची मूर्ती शुभ मानली जात नाही. त्यामुळे मुर्ती खरेदी करताना आसनावर बसलेली मुर्ती खरेदी करा.

रंग: केशरी, पांढरा किंवा पिवळा रंग शुभ मानला जातो. घरात काळ्या रंगाची मूर्ती आणू नये. मूर्तीसोबत त्याचे वाहन, उंदीर हातात असलं पाहिजे. गणपतीला उजवा सुळा पूर्ण आणि डावा सुळा किंचित तुटलेला असावा. त्याला चार हात असावेत.

घरासाठी गणेशाची कोणती मूर्ती?

तुम्ही शुद्ध माती, पितळ, तांबे, चांदी किंवा पांढऱ्या संगमरवरापासून बनवलेल्या मूर्ती खरेदी कराव्यात. मूर्ती कोठेही तुटलेली किंवा फुटलेली नाही याची खात्री करा. घरातील देवघर किंवा पूजास्थळाला शोभेल अशी लहान आकाराची मूर्ती निवडा. खूप मोठी मूर्ती घरासाठी शुभ मानली जात नाही. गणेशाची मूर्ती नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला ठेवावी. ज्याचा फायदाच होतो.

पूजेचे मुख्य नियम

सकाळी लवकर अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. गणेश मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावर करावी. तांब्याच्या भांड्यात पाणी, सुपारी, नाणे आणि आंब्याची पाने घालून ते जवळ ठेवा. गणपतीला फुले आणि तुळस अर्पण करा. विधीनुसार मोदक किंवा लाडू अर्पण करा आणि आरती करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...