
मुंबई : पितृ पक्षात श्राद्ध करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की या काळात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर उतरतात आणि आपल्या कुटुंबाला भेट देतात. पितृपक्षात (Pitru Paksha) श्राद्ध, पिंड दान आणि तर्पण योग्य रीतीने केले तर दिवंगत आत्म्यांना शांती मिळते आणि ते सुखी व समाधानी परततात. आज पितृ पक्षाची अष्टमी तिथी आहे, त्यामुळे आज अष्टमी श्राद्ध केले जाईल. अष्टमी श्राद्धात, अष्टमी तिथीला मृत कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध केले जाते. याला अष्टमी श्राद्ध म्हणतात.
अष्टमीच्या श्राद्धात आठ ब्राह्मणांना अन्नदान करण्याची पद्धत आहे. या दिवशी पिंडदान केल्यानंतर श्राद्ध करावे. यानंतर पंचबली अनुष्ठानाबरोबरच ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि कच्चे धान्य दान करावे. या दिवशी कुशाच्या आसनावर बसून आपल्या पित्यासाठी भगवान विष्णूच्या गोविंद रूपाची पूजा करावी आणि नंतर गीतेच्या आठव्या अध्यायाचे पठण करावे.
तसेच पितृ मंत्राचा जप करून क्षमा मागावी. तांदळाची खीर, पालकाची डाळभाजी, पुरी आणि मिठाई याबरोबरच लवंग, वेलची यांचा अष्टमीच्या श्राद्ध भोजनात निश्चितपणे समावेश करावा. त्यानंतर अष्टमी पितृ मंत्राचा जप करावा – ओम गोविंदाय नमः. श्रद्धेनुसार अष्टमीला श्राद्ध करणार्यावर पितरांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. श्राद्ध केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते.
कुतुप मुहूर्त – सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत
रोहीण मुहूर्त – दुपारी 12:33 ते 01:20 पर्यंत
दुपारची वेळ – दुपारी 01:20 ते 03:41 पर्यंत
07 ऑक्टोबर 2023, शनिवार- नवमी श्राद्ध
08 ऑक्टोबर 2023, रविवार- दशमी श्राद्ध
09 ऑक्टोबर 2023, सोमवार- एकादशी श्राद्ध
10 ऑक्टोबर 2023, मंगळवार- माघ श्राद्ध
11 ऑक्टोबर 2023, बुधवार- द्वादशी श्राद्ध
12 ऑक्टोबर 2023, गुरुवार- त्रयोदशी श्राद्ध
13 ऑक्टोबर 2023, शुक्रवार- चतुर्दशी श्राद्ध
14 ऑक्टोबर 2023, शनिवार- सर्व पितृ अमावस्या
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)