घराच्या मुख्य दरवाज्याजवळ मनी प्लांट लावू शकतो का? जाणून घ्या वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात मनी प्लांटचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्यामुळे अनेक जण घरात, घराजवळ मनी प्लांट लावतात. पण हे लावण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले गेले आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत

घराच्या मुख्य दरवाज्याजवळ मनी प्लांट लावू शकतो का? जाणून घ्या वास्तुशास्त्र
| Updated on: Jul 17, 2025 | 8:36 PM

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात असणं शुभ आणि सकारात्मक उर्जेचं स्रोत मानलं जातं. हिंदू धर्मानुसार, हे रोप देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मनी प्लांट त्याच्या नावाप्रमाणे पैशांची वेळ आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार पैसा आकर्षित करण्याची ताकद यात आहे. त्यामुळे अनेक जण घरात मनी प्लांट आवर्जून लावतात. यामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारते असा समज आहे. वास्तुशास्त्रात या मनी प्लांटबाबत काही नियम सांगितले आहेत त्या नियमांचं पालन केल्यास देवी लक्ष्मी कृपा होऊ शकते. चला जाणून घेऊयात मनी प्लांट कोणत्या दिशेला आणि कुठे ठेवावं? वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांट घराच्या मुख्य दाराजवळ लावू शकता. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होते. पण मनी प्लांट घराच्या मुख्य दाराजवळ लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. वेलवर्गीय असल्याने त्या पद्धतीने त्याची मार्ग देऊ तशी होते वाढ होते. त्यामुळे मुख्य दाराजवळ लावताना वेल जमिनीवर येणार नाही याची काळजी घ्यावी. दोरा लावून वरच्या बाजूला बांधावी.

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट हे घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख समृद्धी येते. पण मनी प्लांट चुकीच्या दिशेला लावलं तर मात्र घरात कलह, आर्थिक अडचण आणि नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. यासाठी मनी प्लांट लावताना दिशेसंदर्भात काळजी घेणं आवश्यक आहे. मनी प्लांट हे कमी पाण्यात आणि कमी प्रकाशतही बहरतं. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नाही.

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटचा थेट संबंध भौतिक सुखांचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाशी येतो. त्यामुळे मनी प्लांट शुक्रवारी लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सौभाग्य, समृद्धी आणि सुख शांती येते. शुक्र ग्रहाचा संबंध असल्याने त्याला शुक्रवारी थोडं दूध टाकलं तर आणखी लाभ मिळू शकतो. शुक्र ग्रह खराब असेल तर त्याचं स्थिती सुधारते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)