Kumbh Mela : कुंभमेळा प्रतिकात्मक करा, पंतप्रधान मोदींचं आवाहन, आखाड्याचा तातडीने रिप्लाय

| Updated on: Apr 17, 2021 | 11:30 AM

कोरोना संकटामुळे आता कुंभमेळा प्रतिकात्मक करा असं आवाहन मोदींनी केलं. पंतप्रधान मोदींनी जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी (Swami Avdheshanand) यांना हे आवाहन केलं.

Kumbh Mela : कुंभमेळा प्रतिकात्मक करा, पंतप्रधान मोदींचं आवाहन, आखाड्याचा तातडीने रिप्लाय
Pm Narendra Modi Kumbha Mela
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोना संकटात (Corona) होत असलेल्या कुंभ मेळ्यावर (Kumbh Mela) मोठं भाष्य केलं. कोरोना संकटामुळे आता कुंभमेळा प्रतिकात्मक करा असं आवाहन मोदींनी केलं. पंतप्रधान मोदींनी जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी (Swami Avdheshanand) यांना हे आवाहन केलं. (PM Narendra Modi speaks to Swami Avdheshanand Giri over telephone, requests that Kumbh Mela should now only be symbolic in the wake of COVID19 pandemic)

हरिद्वारमधील कुंभ मेळ्यात शेकडो साधू-संतांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावरुन आता पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन, साधूंना आवाहन केलं. मोदी म्हणाले, “आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. सर्व संतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्व संत प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यासाठी मी संत जगताचं आभार व्यक्त केलं.

दुसऱ्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात, “मी प्रार्थना केली आहे, सध्या दोन शाही स्नान झाले आहेत. आता कुंभ मेळ्यावरील कोरोना संकट पाहता हा मेळा आता प्रतिकात्मकच ठेवावा. त्यामुळे याविरोधातील लढाईत आणखी एक ताकद मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

दरम्यान, संतांचा दुसरा मोठा आखाडा निरंजनी यांनी साधू संत आणि भक्तांना मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोरोना संसर्गामुळे कुंभमेळा समाप्त होत असल्याची घोषणा केली.

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद (PM’s appeal agreed)

दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर स्वामी अवधेशानंद यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वामी अवधेशानंद म्हणाले, ” पंतप्रधानांच्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवाचं रक्षण हे पुण्य आहे. माझं धर्म परायण जनतेला आवाहन आहे, कोरोनाच्या स्थितीत कोव्हिड 19 नियमांचं पालन करा.

स्वामी अवधेशानंद यांचं ट्विट

कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट

हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.

निरंजनी आखाड्याची घोषणा

हरिद्वार कुंभमेळ्यात भाविक आणि संतांची गर्दी  झाली असून, मोठ्या संख्येनं लोक दररोज कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. यानंतर निरंजनी आखाड्यानंही कुंभमेळा संपुष्टात आल्याची घोषणा केलीय. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभमेळा संपविण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा संपवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणूनच 17 एप्रिल रोजी कुंभमेळा संपेल. बाहेरून आलेल्या सर्व संत, महात्मांना परत जाण्याची विनंती केली गेलीय. 17 एप्रिलपर्यंत कुंभमेळा रिकामा होणार आहे.

संबंधित बातम्या 

कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट, पाच दिवसांत 1701 जण कोरोना पॉझिटिव्ह

हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा; निरंजनी आखाड्याकडून जाहीर