Pradosh Vrat : या तारखेला आहे एप्रिल महिन्याचा पहिला प्रदोष व्रत, पुजा विधी आणि मुहूर्त

| Updated on: Apr 01, 2023 | 4:16 PM

धार्मिक मान्यतेनुसार त्रयोदशी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat) म्हणतात. यावेळी ही तारीख कधी येत आहे ते जाणून घेऊया. हा दिवस सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाईल.

Pradosh Vrat : या तारखेला आहे एप्रिल महिन्याचा पहिला प्रदोष व्रत, पुजा विधी आणि मुहूर्त
प्रदोष व्रत
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मानुसार, प्रदोष व्रतात महादेवाची पूजा केल्याने भक्तांना लवकर शुभ फल प्राप्त होते. महादेव आणि माता पार्वतीच्या विशेष कृपेसाठी प्रदोष व्रत पाळले जाते. धार्मिक मान्यतेनुसार त्रयोदशी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat) म्हणतात. यावेळी ही तारीख 03 एप्रिल रोजी येत आहे. हा दिवस सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाईल. असे मानले जाते की या विशेष तिथीला पूजा केल्याने भोलेनाथ आपल्या भक्तांवर अधिक प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते. असे मानले जाते की सोमवार भगवान शंकराला खूप प्रिय आहे आणि प्रदोष व्रत तिथीही सोमवारी येत असल्याने यावेळी सोम प्रदोष व्रत अधिक विशेष बनले आहे. प्रदोष व्रताची पूजा करण्याची शुभ वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.

प्रदोष व्रताची शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, या महिन्यात सोम प्रदोष व्रत सोमवार, 03 एप्रिल 2023 रोजी येत आहे. प्रदोष तिथी 03 एप्रिल रोजी सकाळी 06.24 पासून सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार, 04 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08.05 वाजता समाप्त होईल. प्रदोष व्रताचा एकूण कालावधी 02 तास 20 मिनिटांचा असेल. तर, पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:49 ते रात्री 09:08 पर्यंत असेल.

हे सुद्धा वाचा

प्रदोष व्रत उपासना पद्धत

प्रदोष व्रत तिथीला ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठावे. या दिवशी स्नान करण्यापूर्वी पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करून मगच पूजास्थळी बसावे. यानंतर भगवान शंकराची आराधना करून व्रत घ्यावे. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी पार्वतीची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. म्हणूनच भगवान शिवासोबत त्यांची पूजा करा. पूजेच्या वेळी देवाला बेलपत्र, धतुरा, फळे, फुले इत्यादी अर्पण करा. यानंतर प्रदोष व्रत कथा पाठ करा आणि शेवटी आरती करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)