
जसे-जसे नव नवीन शोध लागत आहेत, हातात पैसा उपलब्ध होत आहे, तशी-तशी मानवाची ओढ ही अधिक आरामदायी गोष्टींकडे वाढत चालली आहे. माणसाच्या हातात ज्या प्रमाणात पैसा येत आहेत, त्याचप्रमाणात त्याच्या गरजा देखील वाढत आहेत. तो अधिक आरामदायी जीवनशैलीचा शोध घेत आहे. मानवाच्या गरजा सध्याच्या काळात एवढ्या वाढल्या आहेत की, त्याच्याजवळ सर्व काही असून देखील तो समाधानी नाही. म्हणजे जर शेजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू घेतली की लगेचच ती आपल्याला देखील हवी असते. जर ती आपल्याला मिळाली नाही की आपण अस्वस्थ होतो. मन कायम अशांत असतं. यातून अनेक आजार देखील निर्माण झाले आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी वाहनांची एवढी उपलब्धता नव्हती, तेव्हा लोक पायीच प्रवास करायचे, त्यामुळे लोक निरोगी होते. मात्र आता वाहनांमुळे चालन थांबल्यानं सध्या अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. याचप्रमाणे पूर्वी अनेक लोक गार पाण्यानेच अंघोळ करायचे, पण आता गिझर आलं आहे. लोक गरम पाण्यानेच अंघोळ करतात. अंघोळीची योग्य पद्धत कोणती? अंघोळ गार पण्याने करावी की गरम पाण्याने याबाबत प्रेमानंद महाराज यांनी माहिती दिली आहे.
प्रेमानंद महाराज म्हणतात माणसानं नेहमी गार पाण्यानेच अंघोळ केली पाहिजे, गरम पाण्याने अंघोळ करू नये. माणसानं सुख सुविधांचा लाभा घ्यावा, मात्र तो इतका देखील घेऊ नये, की ज्यामुळे तुमची आंतरिक शक्ति कमजोर होईल. तुम्ही जेव्हा गरम पाण्यानं अंघोळ करता, तेव्हा तुम्हाला तेवढ्या पुरता आराम तर मिळतो. मात्र हळूहळू तुमची ऊर्जा नष्ट होऊ लागते, तुमच्या शरीरामध्ये ती ताकद राहत नाही, मग तुम्ही थंडीला घाबरू लागता, तुम्हाला थंड पाण्याची भीती वाटू लागते.
याच्या उलट तुम्ही जेव्हा गार पाण्यानं अंघोळ करता त्याचा फायदा असा होतो की तुमचं शरीर बळकट बनतं. तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, तुम्ही आजारी पडत नाही, एकवेळ अशी येते की कितीही वातावरणात बदल झाला तरी देखील तुम्ही आजारी पडत नाहीत. कारण तुम्ही दररोज थंड पाण्यानं अंघोळ करत असता, असं प्रेमानंद महारज यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)