प्रेमानंद महाराज यांची पदयात्रा अनिश्चितकाळासाठी रद्द, काय झाले नेमके?, २० वर्षांपासून किडनी खराब

प्रेमानंद महाराज यांची पदयात्रा अचानक अनिश्चितकाळासाठी रद्द करण्यात आली आहे. या बातमीमुळे प्रेमानंद महाराजांच्या भक्तांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. मात्र, पदयात्रा आणि चर्चा स्थगित करण्यामागील कारण अद्याप जाहीर केलेले नाही.

प्रेमानंद महाराज यांची पदयात्रा अनिश्चितकाळासाठी रद्द, काय झाले नेमके?, २० वर्षांपासून किडनी खराब
| Updated on: May 19, 2026 | 9:52 PM

Premanand Maharaj : प्रसिद्ध आध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांची प्रसिद्ध पदयात्रा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली आहे. वृंदावन येथील संत प्रेमानंद यांचे अनेक भक्त त्यामुळे नाराज झाले आहेत. प्रेमानंद महाराज यांची ही पदयात्रा केली कुंज स्थित आश्रमापासून सौभरी कुंड येथपर्यंत होते.यावेळी अनेक भक्तांना त्यांचे दर्शनही घेता येत असते. आता केली कुंज स्थित आश्रमाच्या सेवकांनी या संदर्भात ध्वनीक्षेपकावरुन घोषणा केली आहे. तसेच आश्रमातही भक्तांसोबत आमने- सामने होणारा बैठक वार्तालाप देखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे.

प्रेमानंद महाराज यांच्या आरोग्याच्या संदर्भात त्यांची भक्त नेहमीच चिंता करत असतात. प्रेमानंद महाराजांनी स्वत: अनेकदा प्रवचनात सांगितले आहे की सुमारे २० वर्षांपासून त्यांची किडनी खराब आहे. यामुळे जेव्हा पण त्यांच्या आरोग्यासंदर्भात किंवा पदयात्रा बंद होण्या संदर्भात बातमी येते तेव्हा त्यांची भक्त नाराज होतात. त्यांना भेटणाऱ्या अनेक भक्तांनी त्यांच्यासाठी किडनी दान करण्याचा निर्णयही घेतला आहे. अलिकडेच एंटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरजीत सिंह बिट्टा यांनी देखील प्रेमानंद महाराज यांना ही ऑफर दिली आहे.

एमएस बिट्टा यांनी विनम्रपणे प्रेमानंद महाराज यांना सांगितले की मी माझ्या शरीराचे अनेक अवयव कोणा जखमी गरीब सैनिकाला दान करु इच्छीतो. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की मी राधा राणीच्या कृपेने माझ्या किडनीला मंदिराप्रमाणे सांभाळले आहे. मी आज तुम्हाला ती देण्यासाठी आलो आहे. मला निराश करुन माघारी पाठवू नका असे सांगताना एमएस बिट्टा यांच्या डोळ्यात अश्रू आले.

माझ्या किडनी मला हरवू शकत नाहीत

एमएस बिट्टा यांचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रेमानंद महाराज हसत म्हणाले की मी भागवती शक्तीने संपन्न आहे. त्यामुळे माझ्या किडनी मला हरवू शकत नाहीत. ज्या दिवशी माझा अखेरचा श्वास मी घेईल त्याच दिवशी या धोका देतील. जोपर्यंत या फेल असताना डायलिसिसवर राहूनही त्या चालत राहतील, जसे तुम्ही चालत आहात. हा, परंतू, मी हे जरुर सांगेन की जर तुम्ही मृत्यूनंतर तुमचे अवयव कोणा गरीब वा जखमी सैनिकाला देण्याचा संकल्प केला आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे तुमचे शरीर नसल्यानंतरही तुम्ही राहाल. तुम्ही या संकल्पाला जूरुर पूर्ण करा.’

प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की आम्ही जीवनात एक संकल्प केला आहे. आम्ही आमच्या शरीराला समाजसेवेत लावू.परंतू कोणाचा एक थेंबही आपल्या शरीरात घेणार नाही. आम्ही इच्छा आहे की आमचे शरीर दुसऱ्यांच्या सेवेत लागो. हेच या शरीराचे बल आहे.तुम्ही विचार करा २० वर्षांपासून किडनी खराब आहे.अनेक वर्षांपासून डायलिसिसवर आहे. मला बोलण्याची तरी शक्ती राहिली असती का ? ही माझ्यावरील देवाची कृपाच तर आहे’

 

Follow Us