अपघात आणि अकाली मृत्युपासून वाचण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी सांगितले 5 सर्वात शक्तिशाली उपाय
प्रेमानंदजी महाराज आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांवर उपाय सांगत असतात. नुकतंच एका प्रवचनामध्ये त्यांनी अकाली मृत्यू आणि अपघातापासून वाचण्यासाठी पाच शक्तिशाली उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Image Credit source: tv9 marathi
-
-
प्रेमानंदजी महाराज आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांवर उपाय सांगत असतात. नुकतंच एका प्रवचनामध्ये त्यांनी अकाली मृत्यू आणि अपघातापासून वाचण्यासाठी पाच शक्तिशाली उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
-
-
प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे की, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सर्व शुभ व्हावं, चागल्या घटना घडाव्यात तर चरणामृत प्या, चरणामृतामध्ये प्रत्येक दु:ख समस्या दूर करण्याची ताकद आहे.
-
-
प्रेमानंद महाराज यांनी अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी दुसरा उपाय सांगितला आहे की, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा 11 वेळेस “ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः” चा जप करा, आणि नंतरच घराबाहेर पडा.
-
-
आपल्या तिसऱ्या उपयामध्ये प्रेमानंद महाराज म्हणतात की, तुम्ही तुमच्या व्यस्त आयुष्यामधून दररोज 20 ते 25 मिनिटं आवश्य वेळ काढा. या वेळेत तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या इष्ट देवतेच्या नावाचा जप करा, यामुळे तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट टळेल.
-
-
प्रेमानंद महाराज आपल्या चौथ्या उपयामध्ये म्हणतात की तुम्हाला जर अपघात आणि अकाली मृत्यूपासून वाचायचं असेल तर घरातून बाहेर पडताना तुमच्या घरातील देवतांना सांष्टांग दंडवत घाला, तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देखील हा उपाय करू शकता.
-
-
अकाली मृत्यू आणि अपघात टाळण्यासाठी, प्रेमानंद महाराजांनी पाचवा शक्तिशाली उपाय सांगितला तो म्हणजे ते म्हणतात की तुम्ही तुमच्या घरामध्ये वृंदावनाची माती आणा, त्यातील थोडीसी दररोज तुमच्या कपाळला लावा आयुष्यात येणारं प्रत्येक संकट दूर होईल. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)