श्रावणात पावसाचं पाणी तुमचं नशीब बदलू शकतं, संपत्ती आणि आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी खात्रीशीर उपाय
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला मोठं महत्त्व आहे. या महिन्यात अनेकांचे उपवास असतात. तर श्रावणात पाऊस देखली कोसळत असतो. तर हे पाणी तुमचं नशीब बदलू शकतं... संपत्ती आणि आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी खात्रीशीर उपाय

श्रावणातला पाऊस निसर्गाला अप्रतिम रूप बहाल करतो. या महिन्यात सर्वत्र प्रसन्न वातावरण असतं. श्रावणातील पावसामुळे हवामान आल्हाददायक होतं. एवढंच नाही तर, कोरड्या जमिनीला दिलासा मिळून ती हिरवीगार होते. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये पावसाच्या पाण्याला विशेष महत्त्व दिले गेलं आहे. असं मानलं जातं की, स्वच्छ पावसाचं पाणी साठवून केलेले काही सोपे उपाय जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतात. चला तर मग, पावसाच्या पाण्याशी संबंधित काही सोपे वास्तु उपाय जाणून घेऊया.
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय: जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल, तर तुम्ही पावसाच्या पाण्याशी संबंधित हा महत्त्वाचा उपाय करू शकता. यासाठी, एका मातीच्या भांड्यात किंवा तांब्याच्या पातेल्यात पावसाचे पाणी जमा करा. पातेल्यात ठेवलेल्या या पाण्यात चिमूटभर हळद घाला. आता ते घराच्या उत्तर दिशेला ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार, सलग 11 दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी या पातेल्याजवळ दिवा लावल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.
उत्तम आरोग्यासाठी उपाय: कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार घेणं आवश्यक आहेच. परंतु जर कुटुंबातील कोणी दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असेल, तर पावसाच्या पाण्याचा हा उपाय आराम देऊ शकतो. पावसाचे पाणी स्टील किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवा आणि भगवान शिवाची पूजा करा. यानंतर, हे पाणी शिवलिंगावर अर्पण करा आणि ‘महामृत्युजयन मंत्रा’चा 108 वेळा जप करा. यामुळे मनाला शांती आणि सकारात्मकता मिळते, असं देखील म्हणतात.
एवढंच नाही तर, ज्योतिषशास्त्रानुसार, मानसिक अशांतता, निद्रानाश आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेशी संबंधित आहे. यासाठी, तुम्ही एका हिरव्या काचेच्या बाटलीत पावसाचे पाणी भरून ते घरातील एका शांत ठिकाणी ठेवू शकता. असं मानलं जातं की हे पाणी वर्षभरासाठी साठवलं जातं. त्यानंतर, पुढच्या वर्षी जुन्या पाण्याच्या जागी नवीन पावसाचं पाणी भरण्याची परंपरा आहे.
पण नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा. पावसाच्या पाण्याशी संबंधित हे सोपे उपाय ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत. हे उपाय करण्यासाठी, नेहमी स्वच्छ आणि शुद्ध पावसाच्या पाण्याचाच वापर करावा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)