AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप

Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप

| Updated on: Aug 11, 2026 | 3:53 PM
Share

वसई-विरारमध्ये आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसामुळे विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

वसई-विरार परिसरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहनचालकांना मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

विवा कॉलेज परिसरात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळत असून, प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्येही आज पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Published on: Aug 11, 2026 03:13 PM

Follow Us