Rambha Tritiya 2022: आज आहे रंभा तृतीया व्रत; विधी आणि महत्व

| Updated on: Jun 02, 2022 | 3:28 PM

रंभा व्रत हे स्वर्गातली सर्वात सुंदर अप्सरा रंभा हिच्या नावाने हे व्रत ठेवले जाते. पौराणिक कथेच्यानुसार इच्छित वर मिळण्यासाठी अप्सरा रंभा हिने हे व्रत केले होते.

Rambha Tritiya 2022: आज आहे रंभा तृतीया व्रत; विधी आणि महत्व
Follow us on

हिंदू पंचांगानुसार, रंभा तृतीया व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते (Rambha Tritiya 2022).या दिवशी अविवाहित मुली योग्य वर मिळण्यासाठी उपवास करतात. तसेच विधिवत पूजा करतात. विवाहित महिला देखील आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी हे व्रत (Ritual and significance) करतात. रंभा तृतीयेच्या दिवशी स्त्रिया सोळा श्रृंगार करून व्रत करतात. रंभा व्रत हे स्वर्गातली सर्वात सुंदर अप्सरा रंभा हिच्या नावाने हे व्रत ठेवले जाते. पौराणिक कथेच्यानुसार इच्छित वर मिळण्यासाठी अप्सरा रंभा हिने हे व्रत केले होते. रंभा तृतीया किंवा रंभा तीजच्या दिवशी शिव-पार्वती आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते. हे व्रत उत्तर भारतीय स्त्रिया प्रामुख्याने करतात.

जाणून घेउया या व्रताबद्दल अधिक माहिती-

रंभा तृतीया व्रताचा कालावधी-

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 01 जून बुधवारी रात्री 09:47 पासून सुरू होत आहे. हा मुहूर्त 03 जून 2022 रोजी, शुक्रवारी रात्री 12.17 वाजता संपेल.

 

हे सुद्धा वाचा

पूजेचा विधी-

या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून व्रताची सुरवात करावी. पूर्वेकडे तोंड करून पूजास्थानी बसावे. भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती स्वच्छ आसनावर स्थापित करा. मूर्तीच्या समोर सुपारीचा गणपती ठेवा. आसना भोवती पाच दिवे लावा.
प्रथम श्री गणेशाची पूजा करा. यानंतर 5 दिव्यांचे पूजन करावे. यानंतर भगवान शिव-पार्वतीची पूजा करावी. पूजेमध्ये देवी पार्वतीला कुंकू, चंदन, हळद, मेहंदी, लाल फुले, अक्षदा आणि सौभाग्याचे वाण अर्पण करा.
त्याचबरोबर भगवान शिव, गणेश आणि अग्निदेवांना अबीर, गुलाल, चंदन अर्पण करा. प्रसादाला शिरा करा. पूजा झाल्यानंतर श्री गणेश आणि शंकराची आरती करा. जमल्यास एक ब्राम्हण आणि सवाष्ण जेवू घाला. पूजा झाल्यानंतर ॐ ! रंभे अगच्छ पूर्ण यौवन संस्तुते या मंत्राचा जाप करा.

 

आख्यायिका-

रंभाचा विवाह कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी झाला होता असे म्हणतात. एकदा रावणाची नजर रंभावर पडली, तिचे सौन्दर्य पाहून तो घायाळ झाला आणि त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. रावण हा कुबेराचा भाऊ होता, त्यामुळे नात्यात रंभा ही त्याची वहिनी होती. असे असूनही रावणाने रंभावर जबरदस्ती केली. यामुळे संतापलेल्या रंभाने रावणाला शाप दिला की, तो कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श देखील करू शकणार नाही. तसे केल्यास तो जाळून राख होईल. असे मानले जाते की, जेव्हा रावणाने भगवान श्रीरामाची पत्नी सीतेचे अपहरण केले तेव्हा रंभाच्या शापाच्या भीतीने त्याने सीतेला हातही लावला नाही.

(वरील माहिती आध्यात्मिक दृष्टिकोनातून देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाच हेतू नाही)