Rashifal Of 4th March | मीन आणि मेष राशीला आज धन लाभ होणार, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

| Updated on: Mar 04, 2021 | 9:36 AM

चला जाणून घेऊ आजचं राशीभविष्य (Rashifal Of 4th March Horoscope Astrology Of Today)

Rashifal Of 4th March | मीन आणि मेष राशीला आज धन लाभ होणार, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
rashifal
Follow us on

मुंबई : गुरुवारचा दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते (Rashifal Of 4th March Horoscope Astrology Of Today). हा दिवस बृहस्पती देवाचाही मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, बृहस्पति देव आणि श्री हरीची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या घरात सुख-समृद्धी येते. आज 4 मार्च आहे. चला जाणून घेऊ आजचं राशीभविष्य (Rashifal Of 4th March Horoscope Astrology Of Today)

मेष –

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असले. आरोग्य, व्यापार आणि प्रेम यासर्वांसाठी आज चांगला दिवस असेल. वाहन चालवताना खबरदारी बाळगा. न्यायालयीन प्रकरणांमुळे तुम्ही चिंतेत असाल. कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. जुना मित्र भेटल्याने फायदा होईल.

वृषभ –

व्यापारामद्ये आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यावासायिक प्रकरणांमध्ये कुठला मोठा निर्णय घेऊ नका. दाम्पत्य जीवन सुखाचं राहील. कौटुंबिक त्रास दूर होईल. कुठला अशुभ समाचार मिळू शकतो.

मिथुन –

ऑफिसमध्ये सहकर्मचाऱ्यांचा साथ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापार सामान्य रहील. आजच्या दिवशी गणेशाची वंदना करणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. आजचा शुभ रंग हिरवा

कर्क –

आर्थिक स्थिती मजबूत राहील. शिक्षण स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. माता कालीची पूजा करा. त्यांना लाल रंगाचे फुल अर्पण करा.

सिंह –

जमीन खरेदी करु शकता. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. थांबलेल्या कार्यांना गती मिळेल. व्यापार ठीक चालेल. न्यायालयीन प्रकरण प्रलंबित राहातील. ओळखीच्या व्यक्तीपाैसून फायदा मिळेल

कन्या –

घर-कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. लग्नाचे संयोग आहेत. तुमचा आजचा शुभ रंग लाल आहे. आरोग्यावर विशेष लक्ष द्या. रस्त्यावर चालताना खबरदारी बाळगा. व्यापारासंबंधी प्रवासाचे योग जुळत आहेत.

तुला –

आजचा दिवस चांगला असेल. न्यायालयीन काम प्रलंबित असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. आर्थिक लाभ होईल. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. वाणीवर संयम ठेवा. वादापासून दूर राहा. कौटुंबिक जीवन सुखी राहील.

वृश्चिक –

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्हाला शुभ समाचार मिळू शकतो. व्यापारामुळे तणावाची परिस्थिती रहील. भाग्याच्या भरवश्यावर राहून कुठलंही काम करु नका. आरोग्यही चांगलं राहील. भगवान शिवची आराधना करा.

धनू –

आज पितृ प्रकरणांमध्ये वादाची शक्यता आहे. न्यायालयीन समस्या उद्भवू शकतात. व्याापरात नवीन लेन-देन होऊ शकते. आजचा दिवस सामान्य असेल. कुठलंही काम करण्यासाठी घाई करु नका. अनोळखी व्यक्तींपासून दूर राहा. तरुणांना करिअर संबंधी माहिती मिळेल.

कुंभ –

आजच्या दिवशी जे काही कराल ते विचार करुन करा. कुठल्याही कामात लवकर नुकसान होऊ शकतं. आरोग्य चांगलं राहील. व्यापार चांगला असेल. दाम्पत्य जीवन सुखमय असेल.

मीन –

आजचा दिवस चांगला असेल. व्यापारात आर्थिक फायदा होऊ शकतो. ऑफिसमध्ये सहकर्मचाऱ्यांसोबतचा वाद मिटू शकतो. आरोग्य आणि प्रेम चांगलं असेल. माता कालीची आराधना करणे शुभ असेल.

Rashifal Of 4th March Horoscope Astrology Of Today

संबंधित बातम्या :

सूर्याचे स्थान बदलणार, पाहा कोणत्या राशींवर ओढवणार संकट, नि कोणत्या राशी होणार मालामाल…

Vijaya Ekadashi 2021 : विजया एकदशीचा काय आहे व्रत, विधी आणि शुभ मुहूर्त, वाचा सविस्तर

Raashifal: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज धनलाभाची शक्यता, नोकरीत बढतीचा योग