Ravivar Upay : रविवारी केलेले हे उपाय आहेत अत्यंत प्रभावी, उघडताता पैशांचे मार्ग

| Updated on: Apr 01, 2023 | 10:34 PM

सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्यदेवाची कृपा असेल तर माणसाची आयुष्यात खूप प्रगती होते

Ravivar Upay : रविवारी केलेले हे उपाय आहेत अत्यंत प्रभावी, उघडताता पैशांचे मार्ग
सूर्य
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आठवड्यातील प्रत्त्येक दिवस कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. या विशीष्ट दिवशी पूजा केल्याने देवता लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. रविवार (Ravivar Upay) हा सूर्य देवाला समर्पित आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रविवारी काही उपाय सांगण्यात आले आहेत. कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी रविवारी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. शिका

रविवारी अवश्य करा हा सूर्याचा उपाय

  1.  सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य दिल्यानंतर आदित्यहृदयस्रोत पठण करावे. असे मानले जाते की यामुळे अचानक आलेले संकट संपते. हा उपाय नियमित केल्यास व्यक्तीला कायमचे दुःखापासून मुक्ती मिळते.
  2. कुंडलीत सूर्याची कमकुवत स्थिती असल्यास रविवारी माशांना पिठाचे गोळे करून खाऊ घातल्यास शुभ लाभ होतो. यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस आहे.
  3. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती करायची असेल तर रविवारी वाहणारे पाणी आणि गूळ-तांदूळ मिसळलेले पाणी नदीत टाकावे. लाल किताबाचा हा उपाय माणसाच्या सर्व आर्थिक समस्या दूर करतो.
  4. अनेक वेळा लोक रविवारचे उपाय करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत ते रविवारी फक्त लाल रंगाचे कपडे घालतात. आणि हेही शक्य नसेल तर खिशात लाल रुमाल ठेवा. यामुळे सूर्याची स्थिती अनुकूल होते.
  5. ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाची फुले अर्पण करा. यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या दूर होते. असे मानले जाते की या दिवशी भिकाऱ्यांनाही काहीतरी खायला द्यावे. ही युक्ती केल्याने व्यक्तीचे भाग्य निश्चितच उंचावेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)