AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : नवं वर्ष सुरु होण्यापूर्वीच घरातून काढून टाका या वस्तू, प्रगतीच्या मार्गात ठरतात अडसर

2024 या वर्षातील शेवटचा महिना सुरु आहे. त्यामुळे नववर्षात नव्या संकल्प आखले जात आहेत. या वर्षाप्रमाणे नवं वर्ष जाऊ नये यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातात. मग तुमच्या प्रयत्नांमध्ये कोणताही अडसर येऊ नये असं वाटत असेल तर या गोष्टी आधी घरातून काढून टाका.

Vastu Shastra : नवं वर्ष सुरु होण्यापूर्वीच घरातून काढून टाका या वस्तू, प्रगतीच्या मार्गात ठरतात अडसर
| Updated on: Dec 04, 2024 | 5:16 PM
Share

नव्या वर्षात नव्या संकल्पांसह सकारात्मक सुरुवात करण्याची जवळपास सर्वांची तयारी आहे. वर्षातील शेवटचा महिना सुरू असून अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी प्रयत्न असणार आहे. पण या प्रयत्नांना कसलाच अडसर येऊ नये असं वाटत असेल तर घरातून काही गोष्टी तात्काळ काढून टाका. कारण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण या वस्तूंमधून घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. जर तुम्हाला वाटत असेल की नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मक उर्जेने व्हावी तर घरातून काही वस्तू बाहेर काढणं खूपच आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगते..

  • वास्तुशास्त्रानुसार, घरात तुटलेला पलंग नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतात. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडसर येऊ नये असं वाटत असेल तर पहिल्यांदा तुटलेला पलंग बाहेर काढा.
  • घरात तुटकीफुटकी भांडी असतील तर त्यातूनही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. वास्तुशास्त्रानुसार अशी भांडी घरात ठेवणं अशुभ मानलं जातं.
  • नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी तुटलेल्या चपला आधी फेकून द्या. यामुळे नकारात्मक उर्जेचा वास राहतो आणि हाती घेतलेली कामं होत नाहीत. आर्थिक अडचण येते.
  • वास्तुशास्त्रानुसार, काचेच्या वस्तूंना तडा गेला असल्यास त्या तात्काळ फेकून द्या. फोटो फ्रेम वगैरे असेल तर काढून टाका किंवा दुरूस्त करून आणा. तडा गेलेल्या काचेमुळे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते.
  • वास्तुशास्त्रानुसार,घरात खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या भंगारात काढून टाका. कारण यामुळे अडगळ तर होते वरून नकारात्मक ऊर्जेचं स्त्रोत ठरते.
  • जीवनात आपली दशा आणि दिशा ठरवण्यात घड्याळाचं महत्त्व आहे. नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी खराब घड्याळ बाहेर टाकून द्या.
  • घरात तुटक्याफुटक्या मूर्ती असतील तर त्यासुद्धा बाहेर काढा. कारण वास्तुशास्त्रानुसार खंडीत मूर्ती घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. खंडीत देवीदेवतांच्या मूर्तींची पूजा करणं योग्य नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप