Saturday Upay: शनिवारी करा हे पाच सोपे उपाय? होईल सर्व त्रासातून मुक्ती

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. तो लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते.

Saturday Upay: शनिवारी करा हे पाच सोपे उपाय? होईल सर्व त्रासातून मुक्ती
शनीवार उपाय
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 13, 2023 | 7:55 PM

मुंबई, शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा (Shaniwar Upay) विधीनुसार केली जाते. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. तो लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

 

शनिवारी करा हे 5 उपाय

 

  1. शनिवारी पिंपळाची 11 न कापलेली पाने घेऊन त्यांचा हार बनवावा, आता जवळच्या शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करावी. पुष्पहार अर्पण करताना ‘ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करत रहा. त्यामुळे कोर्ट-कचेरीतील सर्व अडचणी दूर होतील.
  2. शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या धागा सात वेळा गुंडाळा. परिक्रमा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे. असे केल्याने प्रगती होईल.
  3. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे.
  4. शनिवारी एक काळा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात सोडावा. तसेच ‘शं शनिश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला नोकरी मिळवण्यात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल.
  5. शनिवारी पुष्प नक्षत्रात एक ग्लास पाणी घ्या. त्यात थोडी साखर घाला. हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे. तसेच ‘ओम ह्रीं श्री शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)