AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोठा निर्णय, सहा वर्षात पहिल्यांदाच असं घडणार

Pakistan Cricket Team: पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अखेर संघ जाहीर केला आहे. त्यामुळे स्पर्धेवर बहिष्कार टाकणाऱ्या धमक्या हवेत विरून गेल्या आहेत. असं असताना टी20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करताना पाकिस्तानने एक मोठा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोठा निर्णय, सहा वर्षात पहिल्यांदाच असं घडणार
पाकिस्तानचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोठा निर्णय, सहा वर्षात पहिल्यांदाच असं घडणारImage Credit source: X
| Updated on: Jan 25, 2026 | 3:53 PM
Share

पाकिस्तानने कोणाची साथ द्यावी आणि मित्रधर्म पाळावा अशी अपेक्षा करणं म्हणजे घोडचूक ठरेल. बांगलादेशला याची प्रचिती आली असेल. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशला वगळलं तर खेळणार नाही वगैरे अशा वल्गना हवेत विरून गेल्या आहेत. कारण पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यामुळे पाकिस्तान टी20 वर्ल्डकप खेळणार हे निश्चित आहे. पण या खेळाडूंची निवड करताा पाकिस्तान एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. मागच्या सहा वर्षात आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदा मोठी खेळी केली आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की नेमकं काय केलं? तर त्याचं उत्तर असं आहे की, पाकिस्तान संघाची निवड करताना या संघात हारिस रऊफचं नाव नाही. संघात हारिस रऊफचं नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली नाही.

बिग बॅश लीग स्पर्धेत हारिस रऊफने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. एकीकडे इतर पाकिस्तानी खेळाडू अपयशी ठरले असताना हारिस रऊफने पाकिस्तानची लाज राखली होती. रऊफने बिग बॅश लीग स्पर्धेत 11 सामने खेळले आणि 20 विकेट घेतल्या. पण असं असूनही पाकिस्तान निवड समितीला त्याची कामगिरी काही खास वाटली नाही. पाकिस्तानला टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे सर्व सामने श्रीलंकेत खेळायचे आहेत. पाकिस्तानचे हेड कोच माइक हेसन यांनी सांगितलं की, श्रीलंकेत खेळताना तीन वेगवान गोलंदाज हवे आहेत. वसीम ज्यूनियर, अहमद दानियाल आणि हारिस रऊफच्य नावाचा विचार केला गेला. पण त्यांना संधी देता आली नाही. त्यांच्या ऐवजी शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि सलमान मिर्झा यांना निवडलं आहे.

सहा वर्षात रऊफ शिवाय उतरणार संघ

हारिस रऊफने 2020 मध्ये पाकिस्तान क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून टी20 वर्ल्डकप 2026 पर्यंत जितक्या आयसीसी स्पर्धा झाल्या त्यात हारिस रऊफ खेळला. पण सहा वर्षानंतर त्याला संघातून डावलण्यात आलं आहे. आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत त्याची निवड झाली नाही.

कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
द्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
द्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.