AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Shortage: आता तक्रार कुणाकडे करायची? घरपोच सेवा बंद आता गॅस बुकिंगचे नंबरही बंद, नागरिकांचा मोठा संताप

Gas Booking Numbers Closed: LPG तुटवडा, टंचाईने राज्यातील ग्राहक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. आतापर्यंत घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांचे गॅस बुकिंगचे नंबरही बंद येत असल्याने नागरिक वैतागले आहेत. आता तक्रार तरी कुणाकडे करावी आणि कोण फिर्याद घेणार असा सवाल नागरिक विचारत आहेत. नागरिकांचा संताप संताप संताप दिसून येत आहे.

LPG Shortage: आता तक्रार कुणाकडे करायची? घरपोच सेवा बंद आता गॅस बुकिंगचे नंबरही बंद, नागरिकांचा मोठा संताप
एलपीजी सिलेंडरImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 13, 2026 | 12:17 PM
Share

LPG Shortage: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात गॅस तुटवड्याने नागरिक पुन्हा एकदा रांगेत उभे ठाकले आहे. नोटाबंदीची आठवण नागरिकांना झाली आहे. भर उन्हात नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत आहेत. आतापर्यंत घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांचे गॅस बुकिंगचे नंबर बंद येत असल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीवर गदारोळ होत आहे. तर नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तीन-चार तास रांगेत उभे राहुनही गॅस सिलेंडर मिळेल याची शाश्वती नसल्याने सर्वसामान्यांचा पारा उन्हापेक्षा अधिक वाढला आहे. संतापाचा कडेलोट होण्यापूर्वची उपाय योजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

घरपोच गॅस सेवा बंद तर गॅस बुकिंगचे नंबरही बंद

बीडमध्ये गॅस एजन्सीच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता थेट बीड जिल्ह्यातील नागरिकांवर होत असल्याचे दिसू लागले आहे. प्रशासन घरगुती गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असताना वास्तव मात्र वेगळंच दिसत आहे. गॅस एजन्सीकडून घरपोच डिलिव्हरी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तर बुकिंगसाठी दिलेले फोन नंबरही सतत बंद येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.

नोंदणी करूनही गॅस नाही

धुळ्यातील गॅस एजन्सीवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या दक्षता गॅस एजन्सीवर पोलीस कर्मचारी आणि कुटुंबीयांची सिलेंडर घेण्यासाठी गर्दी दिसून आली. नोंदणी करून देखील घरपोच गॅस मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. पंधरा दिवस होऊन देखील पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना गॅस भेटत नसल्याने शहरातील शिवतीर्थ लगत असलेल्या गॅस एजन्सीकडे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा परिणाम आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही गॅस टंचाईचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे, सिलिंडर मिळणार नाही या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिक एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. जालन्यातील बदनापूर येथील गॅस एजन्सीच्या बाहेर आज सकाळपासूनच एजन्सी उघडण्यापूर्वीच नागरिकांनी तोबा गर्दी केलेली आहे.बुकिंग करूनही सिलेंडर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांची बाचाबाची होऊन गोंधळ देखील उडत आहे.

चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅसची टंचाई; नागरिकांची एजन्सींवर गर्दी

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस बुकिंगसाठी पहाटेपासूनच नागरिकांची गॅस एजन्सींवर मोठी गर्दी होत असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. सरकारकडून गॅसचा साठा पुरेसा असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही ग्राहकांनी जादा दर मिळवण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच ऑनलाइन बुकिंगची सुविधा सुरळीत नसल्याने अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गडचिरोलीत गॅससाठी नागरिकांची मोठी कसरत

गडचिरोली जिल्ह्यातही एलपीजी गॅस पुरवठ्याची कमतरता आहे. राज्य सरकार व जिल्हा प्रशासना गॅसचा तुटवटा नाही असे दावे करीत असले तरी नागरिकांनी गॅस एजन्सी समोर गर्दी करून एलपीजी सिलेंडर खरेदी करावा लागत आहे. गडचिरोली जिल्हा दुर्गम भागात येत असून या ठिकाणी जवळपास 70 टक्के नागरिक एलपीजीवर अवलंबून आहेत. नागरिकांनी सतर्कतेनुसार अग्रिम एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करण्यात येत आहे. गडचिरोली शहर असो की आष्टी, आलापल्ली,अहेरी, सिरोंचा भाग असो मोठ्या प्रतिक्षे नंतर नागरिकांना सिलेंडर मिळत आहे

कांदिवली पोईसर भागात गॅस सिलिंडरसाठी लोकांची मोठी गर्दी

मुंबईतील कांदिवली पोईसर भागात गॅस सिलिंडरसाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. पोईसर हा एक मोठा झोपडपट्टी भाग आहे आणि येथे गॅस पाइपलाइन नाही आहे त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना गॅस सिलिंडर न मिळाल्याने सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. लोक गॅस सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहेत. गॅस सिलिंडर गाड़ी येण्याची वाट पाहत आहेत. आज लोक पहाटे ५ वाजल्यापासून येथे रांगेत उभे आहेत. आजही लोकांना गॅस सिलिंडर मिळतील की नाही याची कल्पना नाही. मुले,वृद्ध आणि महिलांसह सर्व प्रकारचे लोक गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार