AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Booking: गॅस सिलिंडर संपत आलाय? फोनवरून बुकिंग होत नाहीये? असं करा काही सेकंदांत बुकिंग

LPG Cylinder Booking: एचपी, भारत गॅस किंवा इन्डेन या गॅस कंपनींचा एलपीजी सिलिंडर बुक करायचा असेल, तर पाच सर्वांत सोपे पर्याय जाणून घ्या. फक्त फोन कॉलच नाही तर WhatsApp आणि मिस्ड कॉलनेही करू शकता बुकिंग..

LPG Booking: गॅस सिलिंडर संपत आलाय? फोनवरून बुकिंग होत नाहीये? असं करा काही सेकंदांत बुकिंग
LPG CylinderImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2026 | 12:47 PM
Share

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरांमध्ये गॅस टंचाईचे चटके बसत आहेत. एलपीजी सिलिंडर वितरणासाठी चक्क पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. युद्ध सुरूच राहिल्यास गॅस सिलिंडर मिळणार नाही, या भीतीने वितरकांच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. यादरम्यान साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने आता सिलिंडर बुक केल्यानंतर पुढील रीफिलसाठी कमीत कमी 25 दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असं स्पष्ट केलं आहे. याआधी हा कालावधी 21 दिवसांचा होता. अशातच जर तुम्हाला सिलिंडर बुक करायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, ते जाणून घ्या..

WhatsApp ने गॅस सिलिंडर बुकिंग

आजकाल स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडे व्हॉट्स ॲप आहे आणि गॅस कंपन्यांनी या प्लॅटफॉर्मद्वारेही बुकिंगचा पर्याय दिला आहे. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि त्यात तुम्ही व्हॉट्स ॲप वापरत असाल तर त्यावरून तुम्ही एलपीजी सिलिंडर बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीच्या व्हॉट्स ॲप नंबरवर एक छोटासा मेसेज पाठवावा लागेल. जो मोबाइल नंबर गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत असेल त्याच नंबरवरून हा मेसेज पाठवणं गरजेचं आहे.

  • Indane ग्राहक 7588888824 वर REFILL असा मेसेज पाठवू शकतात.
  • Bharat Gas साठी तुम्ही 1800224344 या क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवू शकता.
  • HP Gas ग्राहक 9222201122 क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवून सिलिंडर बुकिंग करू शकता.
  • मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसंदर्भात माहिती मिळेल आणि बुकिंग कन्फर्म झाल्याचा संदेश प्राप्त होईल.

मिस्ड कॉल देऊन बुकिंग

जर तुमच्याकडे इंटरनेट सेवा उपलब्ध नसेल किंवा तुम्ही स्मार्टफोन वापरत नसाल, तरीसुद्धा गॅस सिलिंडर बुक करणं सोपं आहे. यासाठी मिस्ड कॉलचा पर्याय उपलब्ध आहे. जे सर्वसामान्य फोन वापरतात, त्यांच्यासाठी हा सोपा पर्याय आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीच्या मोबाइल नंबरवर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.

  • Indane साठी 8454955555
  • Bharat Gas साठी 7710955555
  • HP Gas साठी 9493602222

मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमची बुकिंग सिस्टिममध्ये नोंद केली जाते आणि त्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाइलवर कन्फर्मेशनचा मेसेज मिळतो.

मोबाइल ॲपद्वारे बुकिंग

सध्याच्या डिजिटल युगात ॲपच्या वापराने एलपीजी सिलिंडर बुक करणं अधिक सोपं झालं आहे. अनेकजण डिजिटल पद्धतीनेच व्यवहार करतात आणि वीज बिल, मोबाइल रिचार्ज, इतर पेमेंसाठी विविध ॲप्सचा वापर करतात. अशाच ॲप्सद्वारे तुम्ही सिलिंडरसुद्धा बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला Paytm, Google Pay किंवा PhonePe यांसारख्या अॅपमध्ये Recharge & Pay Bills या सेक्शनमध्ये जावं लागेल.

या सेक्शनमध्ये तुम्हाला Book a Cylinder चा पर्याय दिसेल. त्यानंतर तुमची गॅस कंपनी निवडून तुम्हाला कंज्युमर नंबर किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर तिथे टाइप करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही गॅस सिलिंडर बुकिंग आणि त्याचं पेमेंटसुद्धा करू शकता.

IVRS कॉलने बुकिंग

गॅस कंपन्यांनी ग्राहकांना थेट फोन कॉलद्वारेही बुकिंगचीही सुविधा दिली आहे. यासाठी IVRS म्हणजेच ऑटोमेटेड कॉल सिस्टिमचा वापर केला जातो. या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरने तुमच्या गॅस कंपनीच्या IVRS नंबरवर कॉल करावा लागेल. कॉल कनेक्ट झाल्यानंतर समोरून एक रेकॉर्डेड आवाज तुम्हाला ऐकू येईल आणि त्यात विविध पर्याय सांगितले जातील.

उदाहरण द्यायचं झाल्यास Indane गॅस कंपनीच्या सिलिंडर बुकिंगसाठी 7718955555 या नंबरवर कॉल केलं जाऊ शकतं. त्यानंतर व्हॉइस इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला रीफिल बुकिंगचा ऑप्शन निवडावा लागेल. हा ऑप्शन निवडताच तुमची बुकिंग पूर्ण होईल आणि त्यानंतर कन्फर्मेशनचा मेसेज येईल.

वेबसाइटद्वारे बुकिंग

जर तुम्ही कम्प्युटर किंवा मोबाइल ब्राऊजरचा वापर करून बुकिंग करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्हाला गॅस सिलिंडर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. बुकिंगचा हा पर्यायसुद्धा सोपा आणि सुरक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला गॅस कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करावं लागेल. तिथे कंज्युमर नंबर किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाइप करून अकाऊंटचा एक्सेस मिळवावा लागेल. लॉगिन केल्यानंतर Book Cylinder किंवा Refill Booking असा पर्याय तुम्हाला दिसेल. त्याची निवड करून तुम्ही सिलिंडर बुक करू शकता आणि पेमेंटसुद्धा पूर्ण करू शकता. इतकंच नव्हे तर तुम्ही डिलिव्हरी स्टेटससुद्धा ट्रॅक करू शकता.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा