AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोला ते शिमला प्रवास, थेट 8 वर्षांनंतर बेपत्ता तरुण घरी परतला, कसा लागला शोध?

महाराष्ट्राच्या अकोलामधून गायब झालेला तरुण थेट 8 वर्षांनंतर परतला. हिमाचल प्रदेशामधील शिमलामधील एका गोशाळामध्ये करत होता काम. थेट....

अकोला ते शिमला प्रवास, थेट 8 वर्षांनंतर बेपत्ता तरुण घरी परतला, कसा लागला शोध?
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 25, 2026 | 3:54 PM
Share

Akola : चित्रपटांमध्ये अनेकदा आपण पाहतो की लहानपणी हरवलेली व्यक्ती वर्षानुवर्षांनी अचानक आपल्या कुटुंबाला भेटते आणि तो क्षण अत्यंत भावनिक ठरतो. अशीच एक हृदयस्पर्शी आणि वास्तवातील कथा महाराष्ट्रातील अकोला येथून सुरू होऊन थेट हिमाचल प्रदेशातील शिमला जवळील एका गोशाळेत येऊन पोहोचली. तब्बल आठ वर्षांपासून बेपत्ता असलेला 19 वर्षीय जयेश बोदाडे अखेर आपल्या कुटुंबाकडे परतला आहे.

2018 साली जयेश बोदाडे हा आपल्या आई आणि भावासोबत घरातून बाहेर पडला होता. मात्र, काही वेळातच त्याचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. जयेश घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्याचे वडील सुधाकर बोदाडे यांनी अकोल्यातील खादन पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केला पण अनेक वर्षे उलटूनही जयेशचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी कुटुंबीयांची आशा मावळत चालली होती.

अकोला ते शिमला प्रवास

दरम्यानच्या काळात जयेश वेगवेगळ्या ठिकाणी काम करत राहिला. पोट भरण्यासाठी तो सतत स्थलांतर करत होता. अखेर तो हिमाचल प्रदेशातील रामपूर बुशहर परिसरात पोहोचला. जिथे त्याला एका गोशाळेत काम मिळाले.

खाणे, राहणे आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने त्या गौशाळेतच काम सुरू केले. या काळात त्याने आपल्या कुटुंबाबद्दल किंवा भूतकाळाबद्दल कुणालाही काहीही सांगितले नाही. ओळखपत्र नसतानाही तो शांतपणे आपले आयुष्य जगत होता.

नियमित तपासणीत उघडकीस आली ओळख

अलीकडेच स्थानिक पोलिसांकडून गोशाळेतील कामगारांची नियमित तपासणी करण्यात आली. सर्व कामगारांकडून ओळखपत्र मागवण्यात आले. मात्र, जयेशकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकीत नेऊन चौकशी केली.

या चौकशीत, पहिल्यांदाच जयेशने आपण महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ अकोल्यातील खादन पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि जुन्या बेपत्ता प्रकरणाची माहिती मिळवली.

व्हिडिओ कॉलवर ओळख, वडिलांच्या डोळ्यांत अश्रू

तपास पुढे नेत पोलिसांनी जयेशचा व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या वडिलांशी संपर्क करून दिला. स्क्रीनवर मुलाचा चेहरा दिसताच वडील सुधाकर बोदाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला ओळखले. आठ वर्षांनंतर आपल्या मुलाला जिवंत पाहून ते अक्षरशः भावुक झाले.

14 जानेवारी रोजी वडील सुधाकर बोदाडे एकटेच शिमल्याला पोहोचले. स्थानिक पोलीस ठाण्यात वडील आणि मुलाची प्रत्यक्ष भेट झाली. तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या या पुनर्मिलनाने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.

बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.