AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती, पुजा करतांना या नियमांचे अवश्य करा पालन

जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिशी संबंधित काही दोष असेल तर शनि जयंतीच्या दिवशी त्याची पूजा करणे राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. शनिदेवाला न्यायाची देवता देखील मानले जाते.

Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती, पुजा करतांना या नियमांचे अवश्य करा पालन
शनि जयंतीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 19, 2023 | 11:34 AM
Share

मुंबई : हिंदू धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाला सूर्यपुत्र मानले जाते. असे मानले जाते की ज्यावर शनिदेवाची वक्र दृष्टी पडते त्याच्या जीवनावर संकटांचा डोंगर कोसळतो. पण, जर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते. शनि जयंतीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिशी संबंधित काही दोष असेल तर शनि जयंतीच्या दिवशी त्याची पूजा करणे राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. शनिदेवाला न्यायाची देवता देखील मानले जाते. शनि जयंती (Shani Jayanti 2023) दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. यावेळी ही तारीख 19 मे 2023 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शनिदेवाची पूजा नियमानुसार केल्यास जातकाला लाभ होतो. शनिपूजेशी संबंधित काही खास नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय अशी काही कामे आहेत, जी करण्यास मनाई आहे. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

शनिपूजेशी संबंधित महत्त्वाचे नियम

तांब्याचे भांडे वापरू नका – धार्मिक कथांनुसार शनिदेवाला सूर्याचे पुत्र मानले जाते. पण, दोघेही एकमेकांचे शत्रू मानले जातात. असे मानले जाते की तांबे सूर्यदेवाला खूप प्रिय आहेत, त्यामुळे शनिपूजेच्या वेळी त्याचा वापर निषिद्ध आहे. तांब्याऐवजी तुम्ही लोखंडी भांडे किंवा कोणतेही भांडे वापरू शकता.

शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नका – शनिदेवाची पूजा करताना थेट समोर उभे न राहण्याचा प्रयत्न करा. याशिवाय शनिदेवाच्या पूजेच्या वेळी तुम्ही थेट त्यांच्या डोळ्यांकडे पाहू नये हेही लक्षात ठेवा. असे केल्याने तुम्हाला शुभ ऐवजी अशुभ परिणाम मिळू शकतात.

या रंगाचा वापर करू नका – धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाला काळा रंग खूप प्रिय आहे. यासोबतच निळ्या रंगाचा वापरही शुभ मानला जातो. पण, शनिपूजेच्या वेळी चुकूनही लाल रंगाचे कपडे घालू नका, हे लक्षात ठेवा. असे मानले जाते की लाल रंग मंगळाचे प्रतीक आहे आणि शनिदेव मंगळाला आपला शत्रू मानत असत.

या दिशेला शनिदेवाची पूजा करा – धार्मिक दृष्टीकोनातून सामान्य पूजेसाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. परंतु, शनिदेवाला पश्चिम दिशेचा स्वामी मानले जाते, म्हणून त्यांची पूजा करताना पश्चिम दिशेकडे तोंड करून बसावे. असे केल्याने तुम्हाला पूजेचा अधिक लाभ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!