AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Pradosh 2023 : या तारखेला आहे शनि प्रदोष व्रत, साडेसाती असणाऱ्यांनी अवश्य करा हे उपाय

प्रदोष व्रत ठेवून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यास पुत्रप्राप्ती होते. तर दुसरीकडे श्रावण महिन्यात प्रदोष व्रत ठेवून भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व बाधा दूर होतात.

Shani Pradosh 2023 : या तारखेला आहे शनि प्रदोष व्रत, साडेसाती असणाऱ्यांनी अवश्य करा हे उपाय
शनि प्रदोषImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 12, 2023 | 8:38 PM
Share

मुंबई :  सध्या हिंदी भाषिकांचा श्रावण (Shrawan 2023) महिना सुरू आहे. या महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जाईल. या प्रदोष (Shani Pradosh Vrat) व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी सर्व भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. या काळात केलेल्या उपासनेने भक्तांच्या मनोकामना जलद पुर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व समस्या ही दूर होतात. हिंदी भाषिकांच्या श्रावणातला पहिला प्रदोष व्रत शनिवार, 15 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. शनिवारी असल्यामुळे या प्रदोषाला शनि प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी सिद्धी योगही तयार होत आहे.

तिथी

त्रयोदशी तिथीची सुरुवात 14 जुलै रोजी रात्री 11.00 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 15 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. प्रदोष काळात संध्याकाळी शंकराची पूजा केली जाते. या कारणास्तव 15 जुलै रोजी शनि प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे. दिवसभर उपवास करून, प्रदोष काळात भगवान शंकराची आराधना केल्यानंतर, एकवेळ फळे खाऊ शकतात.

शनि प्रदोष व्रताचे महत्त्व

प्रदोष व्रत ठेवून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यास पुत्रप्राप्ती होते. तर दुसरीकडे श्रावण महिन्यात प्रदोष व्रत ठेवून भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व बाधा दूर होतात. या दिवशी संध्याकाळचे व्रत ठेवून पुत्रप्राप्तीची इच्छा ठेवून संध्याकाळच्या वेळी भगवान शंकराला जलाभिषेक करावा. तसेच बेलपत्र अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल.

पूजेचा शुभ काळ

शनिवारी प्रदोष व्रत ठेवा. सकाळी स्नान करून उपवास सुरू करा. दुसरीकडे, संध्याकाळी 5:30 ते 7:30 पर्यंत प्रदोष कालात भगवान शिवाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. सूर्यास्तानंतर 45 मिनिटांनी प्रदोष काल सुरू होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?