Shani Sadesati: शनिच्या साडेसातीचा हाेत असेल त्रास, तर आजच्या दिवशी करा हे साेपे उपाय

शनीवारच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे साडेसातीचा त्रास कमी हाेताे. जाणून घ्या साेपे उपाय

Shani Sadesati: शनिच्या साडेसातीचा हाेत असेल त्रास, तर आजच्या दिवशी करा हे साेपे उपाय
शनी
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 17, 2022 | 9:26 AM

मुंबई, शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. असे म्हटले जाते की शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार त्या व्यक्तीला फळ देतात. चांगले कर्म करणार्‍यांना शुभ फळ मिळते आणि वाईट कर्म करणार्‍यांना शिक्षा होते.  असे म्हणतात की, शनिदेवाच्या प्रकोपामुळे मानवच नव्हे तर देवताही थरथर कापतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष असल्यामुळे त्यांचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीच्या राशीला शनीची साडेसाती (Shani Sadesati) असेल तर ती तीन टप्प्यातून जाते. तर दुसरीकडे शनी अडिचकी अडीच वर्षांसाठी असून शनिवारी काही उपाय (Upay) केल्यास व्यक्तीला शनि सतीपासून मुक्ती मिळते.

शनिवारी साडेसातीसाठी उपाय

  1. शनिदोष दूर करण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा मिळविण्यासाठी घरात शमीचे झाड लावा. सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे झाडाची पूजा करा. शमीच्या झाडावर शनिदेवाचा वास असल्याचे मानले जाते. त्यांची पूजा केल्याने माणसाच्या जीवनातील संकटे दूर होतात.
  2. शनिवारी मोहरीचे तेल आणि काळे तीळ शनिदेवाला अर्पण करावे.  यासोबतच शनि चालिसाचे पठण करणे फायदेशीर आहे. या दिवशी दान केल्यानेही शनि दोष लवकर दूर होतो.
  3. शनिदेवाने एकदा हनुमानजींना वरदान दिले होते की ते हनुमानजींच्या भक्तांना त्रास देणार नाहीत. त्यामुळे हनुमानजींची पूजा केल्याने शनिदोष संपतो. नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्ती शनिदोषापासून मुक्त राहते.
  4. असे मानले जाते की भगवान शंकराची आराधना केल्यानेदेखील साडेसातीचा त्रास कमी हाेताे. म्हणूनच शनिवारी शिव चालिसा आणि महामृत्युंजयाचे पठण करा. असे केल्याने शनिदोषातून लवकर सुटका होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)