AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shanishchari Amavasya 2021 | वर्षातील दुसरी शनिश्चरी अमावस्या, जाणून घ्या ही तिथी खास का आहे?

शनिश्चरी अमावस्येच्या (Shanishchari Amavasya 2021) दिवशी स्नान-दान केल्याने आपल्याला पुण्य मिळते. पितृ दोष, काळसर्प दोष यांच्या शांततेसाठी ही अमावस्या सर्वश्रेष्ठ आहे. 2021 मधील ही दुसरी शनिश्चरी अमावस्या असेल. यापूर्वी, 13 मार्चला शनिश्चारी अमावस्येचा योग आला होता

Shanishchari Amavasya 2021 | वर्षातील दुसरी शनिश्चरी अमावस्या, जाणून घ्या ही तिथी खास का आहे?
Shanidev
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई : शनिश्चरी अमावस्येच्या (Shanishchari Amavasya 2021) दिवशी स्नान-दान केल्याने आपल्याला पुण्य मिळते. पितृ दोष, काळसर्प दोष यांच्या शांततेसाठी ही अमावस्या सर्वश्रेष्ठ आहे. 2021 मधील ही दुसरी शनिश्चरी अमावस्या असेल. यापूर्वी, 13 मार्चला शनिश्चारी अमावस्येचा योग आला होता (Shanishchari Amavasya Know The Importance Of This Day And Remedies For Shani Dosh).

ही अमावस्या खास का आहे?

शास्त्रात असे सांगितले आहे की, शनिवारची अमावस्या शुभ परिणाम देणारी असते. या तारखेला तीर्थ स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळते. अमावस्या ही शनिदेवची जन्म तिथी देखील आहे. म्हणून या दिवशी शनिदेवच्या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने कुंडलीत शनि दोष समाप्त होतो. या दिवशी शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करावा आणि गरजू लोकांना खायला द्यावे.

शनि अमावस्येला काय करावे?

या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. संसर्ग टाळण्यासाठी पाण्यात गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र नदीचे पाणी मिसळून घरीच स्नान करा.

यानंतर श्रद्धेनुसार दान देण्याचा संकल्प घ्यावा.

मग गरजू लोकांना दान करावे.

या दिवशी तेल, पादत्राणे, लाकडी पलंग, छत्री, काळे कपडे आणि उडीद डाळ दान केल्याने कुंडलीतील शनि दोष दूर होतो.

तीळ स्नान केल्याने दोष दूर होतील –

शनिश्चरी अमावस्येला गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र नदीच्या पाण्यात तिळ मिसळावे आणि त्या पाण्याने स्नान करावे. असे केल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात.

शनिश्चरी अमावस्येला काळ्या तीळीच्या पाण्याने स्नान केल्याने शनि दोष दूर होतो.

या दिवशी काळ्या कपड्यांमध्ये काळी तीळ ठेवून दान केल्याने शनिची साढेसातीने त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा मिळतो.

तसेच, कलशात पाणी आणि दुधामध्ये पांढरे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने पितृ दोषांचा प्रभाव कमी होतो.

Shanishchari Amavasya Know The Importance Of This Day And Remedies For Shani Dosh

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

शनिचे दुष्परिणाम, राहू-केतूच्या वक्रदृष्टीपासून वाचायचं असेल तर शनिवारचा उपवास करा, जाणून घ्या पद्धत आणि महत्व आणि फायदे

Saturday Astro Tips | शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी ‘या’ वस्तू दान करा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.