शंख वाजवण्याचं महत्त्व काय? शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे फायदे काय?, जाणून घ्या…

| Updated on: Mar 15, 2021 | 12:23 PM

समुद्र मंथनावेळी निघालेल्या 14 रत्नांपैकी एक शंखही आहे (Shankh Origin, Puja). सनातन परंपरेत होणाऱ्या पूजेत शंखाचं अत्याधिक महत्त्व आहे.

शंख वाजवण्याचं महत्त्व काय? शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे फायदे काय?, जाणून घ्या...
Shankh
Follow us on

मुंबई : समुद्र मंथनावेळी निघालेल्या 14 रत्नांपैकी एक शंखही आहे (Shankh Origin, Puja). सनातन परंपरेत होणाऱ्या पूजेत शंखाचं अत्याधिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात जवळपास सर्व देवी-देवतांना आपल्या हातात शंख धारण केला आहे. शंखाला जैन, बौद्ध, शैव, वैष्णव इत्यादी परंपरांमध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूला तर हे तो अत्यंत प्रिय आहे. याच कारणामुळे जिथेही भगवान श्री नारायणाची पूजा होते तिथे शंखनाद केलाच जातो (Shankh Origin Puja And Importance In Hindu Rituals Know Everything).

शंखाची उत्पत्ती कशी झाली?

शंख आपल्या जीवनातील ती पवित्र वस्तू आहे जे उपासनेपासून ते उपचारापर्यंत कामात येतात. याबाबत अशी मान्यता आहे की शंखाची उत्पत्ती भगवान विष्णू यांचे भक्त दंभचा मुलगा दानव शंखचूडपासून झाली होती. शंखचूडच्या अस्थीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या शंखांचा निर्माण झाला होता.

पूजेत शंख का वापरतात?

प्राचीन काळापासून ऋषि-मुनी आपल्या पूजा-साधनेत शंख ध्वनीचा प्रयोग करतात. श्रीहरिचं प्रिय वाद्य यंत्र कुठल्या साधकाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांचं जीवन सुखमय बनवतं. मान्यतेनुसार, शंख वाजवल्याने त्याचा ध्वनि जिथपर्यंत जातो तिथपर्यंतच्या सर्व बाधा, दोष इत्यादी दूर होतात. शंखातून येणारा ध्वनी नकारात्मक ऊर्जेला नष्ट करतो.

शंख पूजन कसं करावं?

घरात नवीन शंख आणल्यानंतर सर्वात पहिले त्याला एका स्वच्छ भांड्यात ठेवा. त्यानंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर गायीच्या कच्या दुधाने शंखाचं स्नान करा. त्यानंतर गंगाजलने स्नान करा. त्यानंतर शंखाला स्वच्छ कपड्याने पुसून चंदन, पुष्प, धूप इत्यादीने पूजा करा. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला निवेदन करा की या शंखात निवास करा. शुभ फळाच्या प्राप्तीसाठी प्रतिदिन पूजा केल्याने पहिले या प्रकारच्या शंखाची पूजा करुनच वाजवा.

शंखाचे फायदे

शंख समुद्र मंथनदरम्यान माता लक्ष्मीसोबत उत्पन्न झाला होता. त्यामुळे शंखाला माता लक्ष्मीचे भ्राता मानलं जातं. अशी मान्यता आहे की ज्या घरात शंख असतो, तिथे माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो. दक्षिणावर्ती शंखा देवता मानलं जातं. याला पूजा घरात ठेवणे आणि वाजवणे अत्यंत शुभ मानलं जातं. शंखाला नेहमी पूजा स्थानी जल भरुन ठेवलं पाहिजे. शंखात जल भरुन घरभर शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते. घरात सकाळ-सायंकाळी शंख वाजवल्याने भूत-प्रेतची बाधाही दूर होते.

Shankh Origin Puja And Importance In Hindu Rituals Know Everything

संबंधित बातम्या :

Shani Amavasya 2021: कुंभ राशीच्या लोकांसाठी खास दिवस, जाणून घ्या अमावस्येचे महत्त्व आणि मनोरंजक तथ्ये

Kumbh Mela 2021 : ‘कुंभ मेळा’, पहिलं शाही स्नान संपन्न, जाणून घ्या पुढील शाही स्नानाची तारीख

Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली ‘ही’ आरती…