Kojagiri purnima 2021 | आता आपल्या प्रियजनांना द्या मराठीतून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा

| Updated on: Oct 19, 2021 | 12:25 PM

अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. या वर्षी 19 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख आणि जास्त असतो. भारतीय परंपरेत कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी चंद्रावरून पृथ्वीवर येते आणि कोण जागत आहे ते पाहते असा समज आहे. चंद्रप्रकाशातील दूध कोजागिरीला पिण्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो हेच कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे. यावर्षी अशी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा.

1 / 6
आज कोजागिरी पौर्णिमा… आजचा दिवस तुमच्यासाठी  सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

2 / 6
शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा, सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

3 / 6
चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो  हिच आजच्या दिवशी प्रार्थना…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

4 / 6
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

5 / 6
आज कोजागिरी पौर्णिमा… आजचा दिवस तुमच्यासाठी  सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा… आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

6 / 6
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!