Shardiya Navratri 2021 : सौभाग्य आणि समृद्धीसाठी या नवरात्रीत घरी आणा ही 4 झाडं…

| Updated on: Oct 09, 2021 | 12:59 PM

अनेक श्रद्धा आणि परंपरा असलेला हा एक अतिशय पवित्र सण आहे. काही लोक काहीतरी नवीन सुरु करण्यावर विश्वास ठेवतात आणि काही नवीन खरेदी करतात. हे विशेष दिवस पवित्र मानले जात असल्याने तुमच्या घरात सौभाग्य आणि समृद्धी आणण्यासाठी काही गोष्टी तुम्ही घरी आणल्या पाहिजेत. असे केल्याने, केवळ महालक्ष्मी तुम्हाला आशीर्वादच देणार नाहीत, तर तुम्हाला तुमच्या सभोवताली सकारात्मकताही जाणवेल.

Shardiya Navratri 2021 : सौभाग्य आणि समृद्धीसाठी या नवरात्रीत घरी आणा ही 4 झाडं...
Hari-Singaar
Follow us on

मुंबई : प्रतीक्षा संपली आणि अखेर नवरात्रीला सुरुवात झाली. यावर्षी गरबा आणि भक्तीचा उत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु झाला. नवरात्री हा नऊ दिवसांचा उत्सव आहे, जो देवी दुर्गाच्या नऊ अवतारांना समर्पित आहे, ज्यांची प्रत्येक दिवशी पूजा केली जाते.

नऊ दिवसांचा हा देवीचा उत्सव समर्पण आणि उत्साहाने साजरे केले जातात. हा सण हिंदू चंद्राच्या आश्विन महिन्याच्या उज्ज्वल अर्ध्या दरम्यान येतो. या वर्षी ते 7 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरु झाला आहे आणि 15 ऑक्टोबर शुक्रवारपर्यंत चालू राहील.

अनेक श्रद्धा आणि परंपरा असलेला हा एक अतिशय पवित्र सण आहे. काही लोक काहीतरी नवीन सुरु करण्यावर विश्वास ठेवतात आणि काही नवीन खरेदी करतात. हे विशेष दिवस पवित्र मानले जात असल्याने तुमच्या घरात सौभाग्य आणि समृद्धी आणण्यासाठी काही गोष्टी तुम्ही घरी आणल्या पाहिजेत. असे केल्याने, केवळ महालक्ष्मी तुम्हाला आशीर्वादच देणार नाहीत, तर तुम्हाला तुमच्या सभोवताली सकारात्मकताही जाणवेल.

1. तुळस

ही एक आध्यात्मिक औषधी वनस्पती मानली जाते. देवी लक्ष्मीचा अवतार म्हणून त्याची पूजा केली जाते. ही वनस्पती सहसा बहुतेक हिंदू कुटुंबांच्या अंगणात लावली जाते. जर ती नसेल तर नवरात्रीच्या दरम्यान ती तुमच्या घरात लावा, मुख्यतः घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला. रोज त्याच्या समोर तुपाचा दिवा लावा आणि त्याची पूजा करा. देवी लक्ष्मी तुम्हाला धन आणि समृद्धी देईल.

2. केळीचे झाड

वास्तू आणि काही पवित्र शास्त्रानुसार केळीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते आणि असे मानले जाते की हे झाड देवांचे निवासस्थान आहे. ही वनस्पती घरी आणा आणि मुख्यतः ईशान्य दिशेला लावा. प्रत्येक गुरुवारी थोडे दूध पाण्यात मिसळून ते मंत्रोच्चार करुन झाडाला अर्पण करावे. यामुळे आर्थिक संकट दूर होईल.

3. वडाचे पान

वटवृक्ष हे श्रीकृष्णाचे विश्रांतीस्थान असल्याचे म्हटले जाते. पवित्र शास्त्र सांगते की वैदिक भजन ही त्याची पाने आहेत. नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी वडाचे पान आणा आणि ते गंगेच्या पाण्याने स्वच्छ करा आणि त्यावर तूप आणि हळद घालून स्वस्तिक बनवा. पूजेच्या ठिकाणी रोज त्याची पूजा करा. सर्व समस्या काही वेळातच संपतील.

4. हरश्रृंगार (रात्री उमलणारी चमेली)

हे एक सुगंधी फूल आहे जे संध्याकाळी उमलते आणि पहाटे कोमेजते. हे समुद्र मंथनाच्या परिणाम स्वरुप प्रगट झाले होते. त्याची पाने आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारांमध्ये वापरली जातात. नवरात्रीच्या काळात ही वनस्पती घरात आणल्यास समृद्धीचे येईल. या वनस्पतीचा काही भाग लाल कपड्यात गुंडाळा आणि आपल्या संचित संपत्तीसह ठेवा, संपत्ती वाढेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shardiya Navratri 2021 | नवरात्रीत देवीच्या या मंत्रांचा जप करा, सर्व मनोकामना होतील पूर्ण

Shardiya Navratri 2021 : नवरात्रीचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या