Janmashtami 2021 | गोकुळाष्टमीच्या दिवशी मोर पीसचे ‘हे’ उपाय दूर करतील सर्व समस्या

| Updated on: Aug 28, 2021 | 2:35 PM

श्रीकृष्णाच्या जयंतीला म्हणजेच गोकुळाष्टमीला आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. यावेळी गोकुळाष्टमी सोमवार, 30 ऑगस्ट रोजी पडत आहे. या दिवशी सर्वत्र श्रीकृष्णाच्या नावाची धूम असते.

Janmashtami 2021 | गोकुळाष्टमीच्या दिवशी मोर पीसचे हे उपाय दूर करतील सर्व समस्या
Janmashtami 2021
Follow us on

मुंबई : श्रीकृष्णाच्या जयंतीला म्हणजेच गोकुळाष्टमीला आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. यावेळी गोकुळाष्टमी सोमवार, 30 ऑगस्ट रोजी पडत आहे. या दिवशी सर्वत्र श्रीकृष्णाच्या नावाची धूम असते. श्रीकृष्णाचे भक्त गोकुळाष्टमीला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि रात्री 12 वाजता पूजा केल्यानंतर उपवास सोडतात.

धर्मग्रंथांमध्ये गोकुळाष्टमीच्या दिवसाचे वर्णन अत्यंत पवित्र असे करण्यात आले आहे. जर तुमच्या आयुष्यात काही समस्या येत असतील तर गोकुळाष्टमीच्या दिवशी तुम्ही मोर पीसाचे काही उपाय करु शकता. मोर पीस भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत. ते डोक्यावर धारण करतात. या दिवशी हे उपाय केल्याने तुमची सर्व बिघडलेली कामं सुरळीत होऊ शकतात –

संपत्ती वाढवण्यासाठी

जर तुम्हाला मेहनत करुनही तुम्ही पात्र असलेले फळ मिळत नसेल, घरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत असेल, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ 5 मोरपीस ठेवा आणि कृष्णासह त्यांची पूजा करा. यानंतर, त्यांना 21 दिवस पूजास्थळी ठेवा आणि पूजा करत राहा. 21 व्या दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी ठेवा. आशीर्वाद मिळतील आणि अशा नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे पैशाचे संकट दूर होईल.

पती-पत्नीचे भांडण संपेल

जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा पती-पत्नीमध्ये भांडणे होत असतील, तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरुममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर दोन मोर पंख एकत्र ठेवा. यामुळे विवाहित जीवनाशी संबंधित समस्या संपतील आणि नातेसंबंधात गोडवा येईल.

वास्तूदोष दूर करण्यासाठी

असे मानले जाते की सर्व देवी-देवता मोर पीसात निवास करतात. त्यामुळे तुमच्या घरात वास्तूशी संबंधित काही समस्या असल्यास गोकुळाष्टमीच्या दिवशी मोराची पीसे घरी आणा. पूजेनंतर ती पूर्व दिशेला ठेवावी. त्या घरात ठेवल्याने वास्तूदोष दूर होतात.

राहू-केतूच्या वाईट परिणामांपासून मुक्त होण्यासाठी

जर तुम्ही राहू-केतूचे वाईट परिणाम भोगत असाल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी बेडरुमच्या पश्चिम भिंतीवर मोर पीस लावा. यामुळे बरेच फायदे मिळतील. या व्यतिरिक्त, घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी, घराच्या प्रवेशद्वाराच्या दरवाजाच्या चौकटीवर बसलेल्या आसनात गणेश जी स्थापित करा. त्यांच्यावर तीन मोराची पीसे लावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि शुभ परिणाम मिळू लागतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Janmashtami 2021 | गोकुळाष्टमीच्या दिवशी या विशेष प्रार्थनेने करा भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न, पूर्ण होतील सर्व इच्छा

Shri Krishna Janmashtami 2021 : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही 10 कामं नक्की करा, श्रीकृष्णाची कृपा लाभेल