Shri Krishna Janmashtami 2021 : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही 10 कामं नक्की करा, श्रीकृष्णाची कृपा लाभेल

भगवान श्री कृष्णाची जयंती श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीलाजन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी जन्माष्टमी केवळ भारताच्या सर्व भागातच नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते. सर्वत्र लोक हा सण उत्साहात साजरा करतात.

Shri Krishna Janmashtami 2021 : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही 10 कामं नक्की करा, श्रीकृष्णाची कृपा लाभेल
Shri Krishna

मुंबई : भगवान श्री कृष्णाची जयंती श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीलाजन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी जन्माष्टमी केवळ भारताच्या सर्व भागातच नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते. सर्वत्र लोक हा सण उत्साहात साजरा करतात. ते देवासाठी प्रेमाने पदार्थ तयार करतात आणि रात्री 12 वाजता श्री कृष्णाची पूजा करुन हा सण साजरा करतात.

यावेळी जन्माष्टमीचा हा पवित्र सण 30 ऑगस्ट रोजी येत आहे. असे म्हणतात की देव फक्त भावनांचा भुकेला असतो. म्हणून, जर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी प्रेमाने, भक्तीभावाने देवाची पूजा केली तर ते खूप प्रसन्न होतात आणि नेहमी त्यांच्या भक्तांवर आशीर्वादाचा हात ठेवतात. तसेच, त्यांचे सर्व दुःख दूर करतात. जर तुम्हालाही या जन्माष्टमीच्या दिवशी देवाला संतुष्ट करायचे असेल आणि त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

1. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता काकडीसह श्रीकृष्णाचे बाल रुपाचा जन्म करा. काकडीला देवकी मातेच्या गर्भाचे प्रतीक मानले जाते.

2. श्री कृष्णाच्या जन्मानंतर शंखात दूध ओतून त्यांचा अभिषेक करा. यामुळे देव अत्यंत प्रसन्न होतात. तसेच तुम्ही दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल यातून तयार केलेल्या पंचामृतानेही अभिषेक करू शकता.

3. अभिषेक केल्यानंतर कान्हाला सुंदर कपडे घाला, मुकुट घाला आणि त्याला सुसज्ज केलेल्या झुल्यामध्ये बसवा.

4. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळाला भेट देऊन फळे आणि धान्य दान करा.

5. कान्हासाठी बासरी आणि मोराची पिसे आणा. पूजेच्या वेळी देवाला ते अर्पण करा.

6. जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाला लोणी आणि साखरेचे नैवेद्य अर्पण करा. तसेच कान्हाच्या पूजेत तुळशीचा वापर नक्की करा.

7. आपल्या बोटाने एक ते पाच वर्षांच्या कोणत्याही मुलाला लोणी आणि साखर खाऊ घाला. याद्वारे तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कन्हैयाला खाऊ घालत आहात.

8. या दिवशी गाय-वासराची मूर्ती घरी आणा आणि पूजास्थळी ठेवून त्यांची पूजा करा.

9. जर घराच्या आसपास कुठे गाय असेल तर गाईची सेवा करा. तिला चारा खायला द्या किंवा भाकरी बनवून खाऊ घाला आणि तिचे आशीर्वाद घ्या. श्री कृष्ण एक ग्वाला होता, म्हणून गाईची पूजा करणाऱ्यांवर तो खूप प्रसन्न होतो.

10. देवाला पिवळे चंदन लावा. पिवळे कपडे घाला आणि हरसिंगार, पारिजात किंवा शेफालीची फुले देवाला नक्की अर्पण करा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Janmashtami 2021 : भाग्य आणि यशासाठी या वास्तू टिप्स वापरून बासरीने सजवा आपले घर

Krishna janmashtami 2021 : कान्हाच्या मुरलीमध्ये दडली आहेत अनेक रहस्ये, जाणून घ्या भगवान श्रीकृष्णाशी संबंधित गोष्टींचे धार्मिक महत्त्व

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI