Mangal Transit in Ardra Nakshatra : सूर्यग्रहणाच्या दिवशी ग्रहांची मोठी हालचाल; ‘या’ 3 राशींना मिळणार बंपर लाभ
या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे ऑगस्ट महिन्यात आहे. विशेष म्हणजे याच दिवशी ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळही नक्षत्र परिवर्तन करणार आहे. हा काळ काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो.

Solar Eclipse 2026 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना अत्यंत उलथापालथीचा आणि महत्त्वपूर्ण बदलांचा ठरणार आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी यंदाचं शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ नक्षत्र परिवर्तन करणार आहे. 12 ऑगस्ट रोजी मंगळ देव राहूच्या स्वामित्वाच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतील आणि 2 सप्टेंबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात राहतील. सूर्यग्रहण आणि मंगळाचे नक्षत्र परिवर्तन यांचा हा विशेष संयोग सर्व 12 राशींवर परिणाम करणारा मानला जात आहे. मात्र, ज्योतिषीय गणनेनुसार 3 राशींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. या राशींच्या लोकांना करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. चला जाणून घेऊया, त्या तीन राशी कोणत्या आहेत.
मंगळ आणि आर्द्रा नक्षत्राचा संबंध काय?
ज्योतिषशास्त्रात मंगळाला ऊर्जा, साहस, भूमी, पराक्रम, आत्मविश्वास आणि भाऊ-बंधूंचा कारक ग्रह मानले जाते. दुसरीकडे, आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. त्यामुळे मंगळाचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश अनेक ज्योतिषीय बदलांचे संकेत देणारा मानला जातो. 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहणही होणार असल्याने त्याच दिवशी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन होणे ही घटना ज्योतिषाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरत आहे. या संयोगामुळे काही राशींना अचानक संधी, आर्थिक लाभ आणि प्रगतीचे मार्ग मिळू शकतात.
आर्द्रा नक्षत्रात किती दिवस असणार मंगळ?
12 ऑगस्ट 2026 रोजी मंगळ हा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 2 सप्टेंबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात राहील. म्हणजेच जवळपास तीन आठवडे मंगळाचा प्रभाव आर्द्रा नक्षत्राशी संबंधित राहणार आहे. आर्द्रा नक्षत्राचा संबंध परिवर्तन, तीव्रता आणि नवीन परिस्थितींशी जोडला जातो. त्यामुळे मंगळाच्या ऊर्जेसोबत या नक्षत्राचा प्रभाव काही राशींसाठी करिअर, पैसा आणि वैयक्तिक आयुष्यात नवीन संधी घेऊन येऊ शकतो.
कोणकोणत्या राशींना मिळू शकतो फायदा ?
कन्या – कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन अनेक बाबतीत सकारात्मक ठरू शकते. ज्योतिषीय मान्यतेनुसार, या काळात जातकांचा कामातील उत्साह वाढू शकतो. तसेच दीर्घकाळापासून रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. एखादी महत्त्वाची संधीही चालून येण्याची शक्यता आहे. मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात आणि करिअरमध्ये पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
तूळ – तूळ राशीच्या जातकांसाठीही मंगळाचा आर्द्रा नक्षत्रातील प्रवेश शुभ परिणाम देणारा ठरू शकतो. या काळात करिअरशी संबंधित बाबींमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. जे नोकरीच्या शोधात असतील, त्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तर नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा उत्पन्न वाढीची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन काम किंवा व्यवसायाशी संबंधित संधी मिळण्याची शक्यता आहे.
मीन – मीन राशीच्या जातकांसाठी देखील , सूर्यग्रहणाच्या दिवशी होणारे मंगळाचे नक्षत्र परिवर्तन मोठा लाभ घेऊन येऊ शकते. ज्योतिषीय मान्यतेनुसार, या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे योग निर्माण होऊ शकतात. अचानक धनलाभाची एखादी संधी मिळू शकते. याशिवाय यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक बदल घडून येऊ शकतात.
सूर्यग्रहण आणि मंगळाच्या संयोगाचा काय परिणाम होऊ शकतो ?
सूर्यग्रहणाच्या दिवशी मंगळाचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश होत असल्याने ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून ही एक विशेष स्थिती निर्माण होत आहे. मंगळ हा, अग्नी तत्त्व आणि ऊर्जेशी संबंधित ग्रह मानला जातो, तर राहूला छाया ग्रह म्हटलं जातं. अशा परिस्थितीत, या दोघांचा संबंध जातकांच्या आयुष्यात अचानक बदल आणि नवीन परिस्थिती निर्माण करणारा ठरू शकतो. काही व्यक्तींसाठी हा काळ यश, प्रगती आणि आर्थिक लाभाचा ठरू शकतो. मात्र, काही राशींना या काळात घाईघाईने निर्णय घेणे, रागावर नियंत्रण न ठेवणे आणि चुकीचे निर्णय घेणं टाळण्याचा, सल्ला देण्यात येत आहे.