AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girls Death By Snake Byte : रात्री झोपेत सर्पदंश, आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

Girls Death By Snake Byte : मृत तीनही विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आलं आहे. रात्रीच्यावेळी ही घटना घडली आहे. आश्रम शाळेत घडलेल्या या घटनेची प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे.

Girls Death By Snake Byte : रात्री झोपेत सर्पदंश, आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना
Representative imageImage Credit source: Representative image
| Updated on: Aug 10, 2026 | 10:36 AM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे ही घटना घडली आहे. विद्यार्थींनी रात्री झोपेत असताना ही घटना घडली आहे. जपतलाई येथे ही अनुदानित निवासी आश्रम शाळा आहे. रात्री विद्यार्थिनी खोलीत झोपलेल्या असताना सापाने दंश केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत तीनही विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आलं आहे. रात्रीच्यावेळी ही घटना घडली आहे. आश्रम शाळेत घडलेल्या या घटनेची प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी घटनास्थळी पोहोचत आहेत. पोलीस पोहोचले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी अशी तीन मृत विद्यार्थिनींची नावं आहेत. तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची माहिती आहे. शेकडो विद्यार्थिनी या आश्रमशाळेत शिक्षण घेतात. या घटनेमुळे त्यांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं आहे. सर्पदंशाची ही घटना रात्री घडली. त्यानंतर वेळेत त्या मुलींना उपचार मिळाले का? हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

रात्री किती वाजण्याच्या सुमारास घडली घटना?

विद्यार्थिनी गाढ झोपेत असताना रात्री दोन ते अडीजच्या दरम्यान ही घटना घडली. या बद्दल समजल्यानंतर विद्यार्थिनीना लगेच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे धानोरा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दीपिका लकडा, सुष्मिता मंडल या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. दीपिका लकडा सहावी तर सुष्मिता मंडल इयत्ता आठवीत शिकत होती. अनु कोरेटी या तिसऱ्या विद्यार्थिनीचा गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपिका मदवी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम या अन्य तीन विद्यार्थिनीवर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपिका मदवी इयत्ता पाचवीत, कविता किरंगा सहावीत आणि समृद्धी नैताम इयत्ता आठवीत शिकत आहे. समृद्धी नैतमची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?