AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somwar Upay : जीवनात करावा लागत असेल संकटांचा सामना तर सोमवारी अवश्य करा हे उपाय

असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय भोळे असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात. या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते.

Somwar Upay : जीवनात करावा लागत असेल संकटांचा सामना तर सोमवारी अवश्य करा हे उपाय
शिवलींगImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 04, 2023 | 7:52 PM
Share

मुंबई : सोमवार हा देवादी देव महादेवाला समर्पित आहे. या दिवशी महादेवाची विधीवत उपासना केल्यास इच्छित फळ प्राप्त होते. देवलोकातील सर्व देवतांमध्ये भगवान शिव सर्वात सहज प्रसन्न होणारे देवता आहे. खर्‍या भक्तीने फक्त तांब्याभर पाण्याने अभिषेक केल्यास ते भक्तांवर प्रसन्न होऊ शकतात. दुसरीकडे अनेक भक्त सोमवारी उपवास करून शिवलिंगाची पूजा करतात. याशिवाय महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर या दिवशी काही खास उपायही करता येतात. या उपायांनी (Somwar Upay) तुमचे कोणतेही काम यशस्वीरित्या पार पडतील. यासोबतच तुम्ही जिवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.

गायत्री मंत्र

गायत्री मातेला वेदमाता म्हणतात. आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी सोमवारी माता गायत्री किंवा माता सरस्वतीच्या फोटोसमोर बसून गायत्री मंत्राचा 11, 21 किंवा 51 वेळा जप करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि लवकरच यशाचे दरवाजे उघडतील.

पिंपळाचे झाड

प्रत्येकाला आयुष्यात प्रगती हवी असते तसेच कुटुंबातही आनंद हवा असतो. म्हणूनच ज्योतिष शास्त्रानुसार कौटुंबिक सुख टिकवायचे असेल तर सोमवारी पिंपळाच्या झाडाचे ध्यान करावे आणि दोन मिनिटे हात जोडून त्या झाडाला नमस्कार करावा. असे केल्याने तुमचा कौटुंबिक आनंद कायम राहील.

वैवाहिक सुखासाठी

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वैवाहिक जीवनावर कोणाची वाईट नजर लागली आहे आणि पती-पत्नीमध्ये प्रेमाची कमतरता आहे, तर तुम्ही या राहूच्या मंत्राचा 5 वेळा जप करावा.

राहु मंत्र- ‘ओम भ्रम भ्रम स: राहावे नम:’ असे केल्याने तुमच्या वैवाहिक नात्यावर कोणाचीही वाईट नजर पडणार नाही.

मानसिक त्रास दूर करण्यासाठी

जर तुम्ही बऱ्याच काळापासून काही मानसिक आजाराने त्रस्त असाल आणि तुमचे काम नीट होत नसेल तर सोमवारी शिवलिंगावर थोडेसे दूध पाण्यात मिसळून अभिषेक करा. या उपायाने तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?