Somwar Upay : फलप्राप्तीसाठी सोमवारी विधीवत करा महादेवाची पुजा, या चार नियमांचे अवश्य करा पालन

सोमवारी भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते.

Somwar Upay : फलप्राप्तीसाठी सोमवारी विधीवत करा महादेवाची पुजा, या चार नियमांचे अवश्य करा पालन
शिवलींग
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 06, 2023 | 7:55 AM

मुंबई : हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार भगवान शिव जेवढे क्रोधीत तेवढेच भोळे आहेत. हिंदू धर्मात सर्व देवी-देवतांची विशिष्ट दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे. शास्त्रानुसार सोमवार (Somwar Upay) हा भगवान शिव यांना समर्पित आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी लोकं सोमवारी उपवास करतात. सोमवारी भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते. भगवान शिवाच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे. या दिवशी दुग्धाभिषेकालाही खूप महत्त्व आहे.

भगवान शिवाची सोमवारच्या दिवशी भक्ती भावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी.

भोलेनाथाला करा या वस्तू अर्पण

सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी शिवलिंगावर चंदन, अक्षत, बिल्वपत्र, धतुरा, दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.

सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. नैवेद्यानंतर भोलेनाथाची उदबत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा. असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील.

या मंत्राने होईल फायदा

सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्यास भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होते. शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध अर्पण करणे हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो.

गरजू लोकांना दान करा

सोमवारी स्नान केल्यानंतर पांढर्‍या रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी पांढर्‍या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत. यामुळे कुंडलीत चंद्र ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती नांदते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)