Spiritual: आज सोम प्रदोष व्रत; जुळून येत आहेत चार शुभ योग

आषाढ महिन्यातील प्रदोष व्रत  सोमवार, 11 जुलै रोजी म्हणजेच आज आहे. हा दिवस सोमवार असल्याने याला सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat) म्हणतात. यानंतर पुढील प्रदोष व्रत श्रावण महिन्यात (Shrawan Month) येईल. प्रदोष व्रतामध्ये भगवान शंकराची आराधना केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते असे सांगितले जाते. यावेळी सोम प्रदोषावर चार शुभ संयोग होत असल्याने […]

Spiritual: आज सोम प्रदोष व्रत; जुळून येत आहेत चार शुभ योग
Nitish Gadge | Updated on: Jul 11, 2022 | 10:25 AM

आषाढ महिन्यातील प्रदोष व्रत  सोमवार, 11 जुलै रोजी म्हणजेच आज आहे. हा दिवस सोमवार असल्याने याला सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat) म्हणतात. यानंतर पुढील प्रदोष व्रत श्रावण महिन्यात (Shrawan Month) येईल. प्रदोष व्रतामध्ये भगवान शंकराची आराधना केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते असे सांगितले जाते. यावेळी सोम प्रदोषावर चार शुभ संयोग होत असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. सोम प्रदोष व्रतामध्ये रवियोग, ब्रह्मयोग, शुक्ल योग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकाच वेळी तयार होत आहेत. सोम प्रदोष व्रताची सुरुवात ब्रह्मयोग आणि सर्वार्थ सिद्धी योगाने झाली आहे. आज सूर्योदयापासून रात्री 9 वाजेपर्यंत शुक्ल योग आणि पहाटे 5.15 ते 5.32 पर्यंत रवियोग असेल. अशा शुभ योगात शिवाची उपासना फार फलदायी ठरते.

सोम प्रदोष व्रतासाठी शुभ मुहूर्त

आज सोम प्रदोष व्रतावर भगवान शिवाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 07.22 ते रात्री 09.24 पर्यंत असेल. उपासकांना आज तब्बल दोन तास पूजेसाठी मिळणार आहेत. इतर प्रदोष काळाच्या तुलनेत हा कालावधी मुबलक आहे.

सोम प्रदोष व्रताची पूजा पद्धत

सोम प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटे भगवान शिवाची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी फिकट लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. चांदीच्या किंवा तांब्याच्या पात्रातून शुद्ध मध शिवलिंगाला अर्पण करा. यानंतर शुद्ध पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करून ओम सर्वसिद्धि प्रदाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तुमच्या समस्येसाठी भगवान शिवाची प्रार्थना करा. प्रदोष व्रत कथा वाचा आणि शिव चालिसा वाचा. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us