नवीन वर्षात हे 4 रोपं बदलतील तुमचं नशीब, या दिशेने लावल्याने येईल समृद्धी

नवीन वर्ष अगदी जवळ आले आहे. या नवीन वर्षात तुमचे नशीब उजळवायचे असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या घरात काही पवित्र रोपं लावा. धार्मिक श्रद्धेनुसार ही रोपे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. चला तर मग नवीन वर्षात कोणती रोपं लावावीत ते जाणून घेऊयात.

नवीन वर्षात हे 4 रोपं बदलतील तुमचं नशीब, या दिशेने लावल्याने येईल समृद्धी
Lucky Plant
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 4:11 PM

2025 हे वर्ष संपायला काही दिवसच उरलेले आहे. त्यानंतर नवीन वर्ष 2026 सुरू होईल. नवीन वर्ष म्हंटल की अनेकजण नवीन प्रवासाला नवीन ध्येय विचार संकल्प घेऊन सुरूवात करतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्यापैकी अनेकजण हे देव-देवतांची विशेष पूजा करतात आणि अनेक उपाय करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद आणि शांती राहते. तसेच सनातन धर्मात काही वनस्पती व रोपं आहेत ज्यांचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार तुम्ही घरात तुळस, केळीचे रोपं, मनी प्लांट आणि शमीचं रोपं लावल्याने या रोपांचे शुभ परिणाम व्यक्तीच्या जीवनावर व घरावर होत असतो. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. अशावेळेस सुख आणि समृद्धी वाढविण्यासाठी घराच्या कोणत्या दिशेने ही रोपं लावावीत हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

तुळशीचे रोप

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. यामुळे घरात लक्ष्मी देवीचे आगमन होते आणि घरात सुख-समृद्धी वाढते. तुळशीच्या झाडाभोवती स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, कारण लक्ष्मीदेवी फक्त स्वच्छ ठिकाणीच राहते.

केळीचे रोप

वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला केळीचे रोप लावावे. हे रोप भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूच्या पूजेत म्हणजेच सत्यनारायण पुजेला केळीचा पानांचा खाबांचा वापर केला जातो . धार्मिक श्रद्धेनुसार घरात केळीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी वाढते आणि लग्नातील अडथळ्यांपासून मुक्तता मिळते.

मनी प्लांट

याव्यतिरिक्त येत्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. हे रोप आग्नेय दिशेला लावावे. धार्मिक श्रद्धेनुसार घरात मनी प्लांट ठेवल्याने आर्थिक स्थिरता राहते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

शमीचे रोप

धार्मिक श्रद्धेनुसार शमी वृक्षाची पूजा केल्याने भगवान शिव आणि शनिदेव यांचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे घरात शांती आणि आनंद येतो. वास्तुशास्त्रानुसार हे रोप दक्षिण दिशेला लावावे. घरात शमी वृक्ष लावल्याने शनी दोषापासून आराम मिळतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)