
सकाळची वेळ ही खूप पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असते. हिंदू धर्मातील अनेक शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये म्हटलं आहे, तसेच साधू , सतांनी देखील सांगितलं आहे की व्यक्तीने नेहमी सूर्योदयापूर्वीच झोपेतून उठलं पाहिजे. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी झोपेतून उठतो किंवा सूर्योदयाच्या वेळी झोपेतून उठतो आणि सूर्यदेवाला नमस्कार करतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही, असा व्यक्ती नेहमी आरोग्यदायी राहतो, त्याला कुठलाही आजार होत नाही, तसेच त्याच्या घरात कधीची धनाची कमतरता जाणवत नाही. दररोज सकाळी लवकर झोपेतून उठण्याचे फायदे सांगताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, दररोज सकाळी झोपेतून लवकर उठून सूर्यदेवाची पूजा केल्यानं व्यक्तीला केवळ अध्यात्मिक फायदाच मिळत नाही तर ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील फायद्याचं ठरतं. कारण जो माणूस सकाळी लवकर उठतो, तो व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्या आयुष्यभर फिट राहतो.
प्रेमानंद महाराज म्हणतात ज्या लोकांना झोपेतून उशिरा उठण्याची सवय आहे, त्या लोकांच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज हळुहळु कमी होण्यास सुरुवात होते. कारण तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून लवकर उठता, तेव्हा संपूर्ण वातावरण हे सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असतं. सूर्याची कोवळी किरणं, थंडी हवा आणि अध्यात्मिक वातावरण याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो, परिणामी जे लोक दररोज सकाळी लवकर उठतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते.
दुसरा तोटा सांगताना प्रेमानंद महाराज म्हणतात की जे लोक झोपेतून सकाळी उशिरा उठतात त्याच्या चेहऱ्यावरील ताजेपणा हळुहळु कमी होतो, असे लोक आळशी होतात, मग त्यांना कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे माणसानं नेहमी सकाळी लवकर झोपेतून उठलं पाहिजे.
आळस – प्रेमानंद महाराज म्हणतात जे सकाळी उशिरा उठतात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे असे लोक आळशी असतात, उशिरा उठल्यामुळे त्यांच्या अंगात आळस कायम राहतो, अशा लोकांना कोणतंही काम लवकर करण्याची इच्छा होत नाही.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)