
आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये वास्तुची भूमिका फार महत्त्वाची असते. बऱ्याचदा, वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने अनेक समस्या टाळता येतात. तसेच काही वेळेला नकळत केलेल्या चुका देखील नकारात्मक परिणाम देऊ शकतात. म्हणून, वास्तुचे नियम योग्यरित्या समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रात घरतील प्रत्येक वस्तूसाठी आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यासाठी वास्तू टीप्स सांगितल्या आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी वास्तुशास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे देवघर. पूजा आणि विधींशी संबंधित देखीस काही वास्तु टिप्स आहेत जे घरात शांती राखण्यास मदत करतात. शास्त्रांनुसार देवघरात काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. त्या वस्तूंचा नकळत घरातील वातावरणावर प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घेऊयात. त्या वस्तू कोणत्या आहेत ते.
या वस्तू देवघरात कधीही ठेवू नयेत
1. देवघरात कधीही तुटलेली किंवा भंग पावलेली मूर्ती ठेवू नये. जर मूर्तीचा कोणताही भाग तुटला असेल तर तो ताबडतोब काढून टाका. जर परवानगी असेल तर जवळच्या मंदिरात नेऊन ठेवावी किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जीत करावी. अशी मूर्ती प्रार्थना कक्षात ठेवणे म्हणजे वास्तुदोष मानला जातो.
2. प्रार्थना कक्षात कधीही कोणत्याही तीक्ष्ण वस्तू ठेवू नका. असे केल्याने घरात खूप नकारात्मक ऊर्जा येते. ही नकारात्मकता अनेकदा विनाशाकडे नेते. म्हणून, प्रार्थना कक्षाजवळून अशा कोणत्याही वस्तू असतील तर त्या काढून टाका.
3. हिंदू धर्मात, पूजेदरम्यान शंख वाजवण्याचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्याचा आवाज जिथे पोहोचतो तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतो. लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात कधीही एकापेक्षा जास्त शंख नसावेत.
4. स्वच्छतेच्या नावाखाली लोक देवघरात मळलेले कापड वापरतात. पूजास्थळ नेहमीच स्वच्छ असले पाहिजे. म्हणून, तिथे मळलेले किंवा फाटलेले कपडे टाकणे योग्य नाही. असं केल्याने घराची शांती भंग होते.
5. मंदिरात कधीही माचिस ठेवू नका. प्रार्थना कक्षात माचिस ठेवल्याने नकारात्मकता येते. माचिस बॉक्स तुम्ही प्रार्थना कक्षापासून दूर ठेवणे चांगले. तसेच जळलेली म्हणजे वापरलेल्या माचिसच्या काड्या देखील प्रार्थना कक्षाजवळ ठेवू नयेत. त्याचाही विपरीत परिणाम होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)