
हिंदू धर्मामध्ये पूजा, प्रार्थना या सारख्या गोष्टींचं विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या कामात कितीही व्यस्त असाल, तरीही दिवसातून थोडा वेळ दररोज देवासाठी द्या, या काळात देवाची पूजा करा, ध्यानधारणा करा, देवाची प्रार्थना करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल, एवढंच नाही तर दिवसभराच्या कामासाठी तुम्हाला त्यातून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. तुमचा दिवस चांगला जातो, देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. काही लोक हे मंदिरात जाऊन देवाची पूजा करतात, तर काही लोक हे त्यांच्या घरी असलेल्या देवघरातील देवांची पूजा करतात.
तुम्ही पुजा कुठेही करा मात्र त्यासाठी काही नियम आहेत, आणि त्या नियमांचं पालन योग्य पद्धतीनं न झाल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे, काय आहेत ते नियम, तुमच्या देवघरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या नसाव्यात याबाबत प्रेमानंद महाराज यांनी माहिती दिली आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत.
प्रेमानंद महाराज म्हणतात अनेकदा आपण देवघरात अशा वस्तू ठेवतो ज्याचा प्रभाव हा पूजा करणाऱ्यासोबतच त्या संपूर्ण घरावर देखील पडतो. अशा काही वस्तू असतात त्या जर तुमच्या देवघरात असतील तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा प्रभाव हा तुमच्या प्रगतीवर होतो, त्यामुळे अशा वस्तू चुकूनही देवघरात ठेवू नये, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडित झालेल्या मूर्ती, प्रेमानंद महाराज म्हणतात तुमच्या देवघरात कधीही खंडीत झालेल्या मूर्ती नसाव्यात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. खंडित झालेल्या मूर्तीची पूजा करू नये. फाटलेली पुस्तक, पोथ्या, प्रेमानंद महाराज म्हणतात देवघरात चुकूनही फाटलेली पुस्तक किंवा पोथ्या असू नयेत.
देवाला वाहिलेली फूल, प्रेमानंद महाराज म्हणतात जी फूल तुम्ही देवाला वाहिली आहेत, ती वेळोवेळी बदलली पाहिजेत, सुकलेल्या फुलांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आपल्या पूर्वजांचा फोटो, प्रेमानंद महाराज म्हणतात देवघरात आपल्या पूर्वजांचा फोटो ठेवू नये, तो घरात इतर ठिकाणी विशेष करून दक्षिण दिशेला लावावा, वरील नियमांचं पालन केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहणार नाही, सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)