Chanakya Neeti : या तीन लोकांना पृथ्वीवरच मिळतो स्वर्ग प्राप्तीचा आनंद, चाणक्य काय म्हणतात?

चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचे जर कोणत्याही व्यक्तीनं आपल्या आयुष्यात पालन केलं तर तो यशस्वी बनतो शकतो, अशाच काही गोष्टींबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Neeti : या तीन लोकांना पृथ्वीवरच मिळतो स्वर्ग प्राप्तीचा आनंद, चाणक्य काय म्हणतात?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2025 | 6:26 PM

चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचे जर कोणत्याही व्यक्तीनं आपल्या आयुष्यात पालन केलं तर तो यशस्वी बनतो. चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये मानवी आयुष्याशी संबंधित अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेक व्यक्तींना आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात. थोडक्यात काय तर व्यक्तीनं आयुष्य कसं जगावं याचं सार चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात जगात तीन लोक हे खूप सुखी असतात आणि अशा व्यक्तींना पृथ्वीवरच स्वर्ग प्राप्तीचा आनंद मिळतो.जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.

भाग्यवान वडील – चाणक्य म्हणतात असा व्यक्ती खूप नशीबवान असतो, ज्याची संतती ही कर्तृत्वान निघते. आपल्या कतृत्वानं कुळाचं नाव मोठं करते. आई-वडिलांची सेवा करते.त्यांना कधीही आयुष्यात कष्टी होऊ देत नाही, दु:ख देत नाही. अशा वडिलांना पृथ्वीवरच स्वर्गाची प्राप्ती होते.

समजूतदार पत्नी – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीची पत्नी ही समजूतदार असते, कमी पैशांमध्येही घर उत्तम प्रकारे चालवण्याचं कसब जिच्यामध्ये असतं. जी महिला आपल्या पतीच्या भावना समजून घेते, त्याला घर चालवण्यासाठी मदत करते आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करते, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कायम आनंद असतो.

समाधान – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती प्रामाणिकपणे धन कमावतो. आपल्या कमावलेल्या धनावर समाधानी असतो, जास्त धन कमावण्याच्या लालसेनं कधीही कोणाचं नुकसान करत नाही, अशा व्यक्तीला कधीच कोणत्याच गोष्टींची कमी पडत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. समजूतदार पत्नी, थोड्या संपत्तीमध्ये समाधान आणि कर्तृत्ववान संतती या तीन गोष्टी अशा आहेत, ज्या माणसाला या पृथ्वीवरच स्वर्गाची अनुभूती देतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)