Premanand Maharaj : माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी जातात, पहा प्रेमानंद महाराज काय सांगतात?
प्रेमानंद महाराज हे एक मोठे संत आहेत, त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी त्यांचे भक्त गर्दी करत असतात, सोप्या भाषेमध्ये आपल्या भक्तांना अध्यात्माचं महत्त्व समजून सांगणं हे प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनाचं वैशिष्ट आहे, प्रेमानंद महाराज म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या मृत्यूनंतर देखील आपल्या सोबोत येतात.

प्रेमानंद महाराज म्हणतात, या जगात फक्त तीनच अशा गोष्टी आहेत, ज्या मृत्यूनंतरही तुमच्यासोबत येतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पुण्य, दुसरी गोष्ट म्हणजे पाप आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताचं नामस्मरण. तुम्ही तुमच्या आयुष्यात पुण्य केलंय, पाप केलंय, भगवताचं नामस्मरण केलंय तर या गोष्टी तुमच्यासोबत येणार. याच तीन गोष्टी पुढे चालून तुमच्या उद्धाराचं कारण बनतात. जर तुम्ही पुण्य केलं असेल तर तुम्हाला मोक्ष मिळतो, पाप केलं असेल तर मोक्ष मिळत नाही आणि हेच पुण्य तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणामधून मिळते, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. जर तुम्ही पाप केलं असेल तर तुम्हाला अनेक यातना होतील, तुमच्यावर अनेक संकट येतील, शरीर व्याधीग्रस्त बनेल, आणि जर तुम्ही पुण्य केलं असेल तर तुमचा लौकिक वाढेल, तुम्हाला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होईल, असंही त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये म्हटलं आहे.
प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात हे शरीर नश्वर आहे. जेव्हा तुमचा मृत्यू होतो, तेव्हा तुमचा आत्मा तुमच्या शरीराचा त्याग करतो. त्यानंतर तुम्ही जर पुण्य केलं असेल किंवा पाप केलं असेल तसा-तसा आणि त्या-त्या ठिकाणी आत्मा जन्म घेतो, आणि तसेच कर्म देखील त्याच्या वाट्याला येतात. त्यामुळे आपल्याला पुण्य कमवायचं आहे. आपल्याला पाप करायचं नाहीये, आणि हे पुण्य तुम्हाला देवाच्या नामस्मरणातून मिळणार आहे, त्यामुळे भगवंताचं नामस्मरण नित्य केलं पाहिजे, त्यातूनच तुमची प्रगती होईल.
भगवंताच्या नाम जपात एवढी ताकद आहे, की तुमच्याकडे कितीही पैसे असून तुम्हाला समाधान मिळणार नाही, मात्र तुम्ही जेव्हा देवाचा नाम जप करता तेव्हा तुम्हाला आत्मिक समाधान लाभतं. तुमची अध्यात्मिक प्रगती होते, असंही यावेळी प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये नाम जपाचं महत्त्व समजून सांगितलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
