AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनानेच बरा होतो हृदयरोग; ती रंजक कहाणी काय?

Lord Shiva Shravan : तर या मंदिरात आल्यावर भाविकांचे हृदयासंबंधीचे आजार दूर पळतात अशी मान्यता आहे. भगवान शंकराच्या दर्शनाने त्यांना हा आजार बळावत नसल्याचा दावा करण्यात येतो. कुठं आहे हे मंदिर?

या मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनानेच बरा होतो हृदयरोग; ती रंजक कहाणी काय?
येथे बरे होतात हृदयाशीसंबंधित रोग
| Updated on: Aug 13, 2025 | 4:38 PM
Share

भारतात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. अनेक मंदिरं आहेत, त्यांच्याशी संबंधित अनेक अख्यायिका आणि श्रद्धा आहेत. भाविक भक्तांना त्याचे आश्चर्य वाटते. असेच एक अनोखे मंदिर आहे. जिथे भाविकांचे आजारपण कुठल्या कुठे पळून जाते अशी मान्यता आहे. भगवान शंकराच्या दर्शनानेच येथे आलेल्या भाविकांच्या हृदयासंबंधीचे आजार दूर पळतात अशी मान्यता आहे. उच्च रक्तदाब असो वा इतर हृदयाशी संबंधित आजार असोत ते पळून जातात, अशी मान्यता आहे. हे मंदिर तामिळनाडू राज्यात आहे. काय नाव आहे या मंदिराचं?

हृदयाशी संबंधित आजार पळतात दूर

तर या जादुई मंदिराचे नाव हृदयलेश्वर मंदिर असे आहे. हे मंदिर तामिळनाडू राज्यात आहे. येथे भाविकांचा उच्च रक्तदाब, हृदयातील ब्लॉकेज या सारख्या समस्या भगवान शंकराच्या दर्शनानेच बरे होतात. सोशल मीडियावरील इन्फुएंसर द टेम्ल गर्लने तिच्या इन्स्टाग्रामवर याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हजारो हृदयरोगी त्यांचे आजार बरे करण्यासाठी पूर्ण श्रद्धेने या मंदिरात येतात. भगवान शिवाला साकडं घालतात आणि त्यांचे रोग बरे होतात अशी मान्यता आहे.

हृदयलेश्वर मंदिराची खासियत तरी काय?

तामिळनाडूतील हृदयलेश्वर मंदिराचा हृदयाचा स्वामी या अर्थाने आहे. या मंदिरात दूध, फुल, बेल वाहून भगवान शिवाची पूजा करण्यात येते. या मंदिरात भगवान शंकर पश्चिमेकडील तर माता पार्वती या दक्षिणेकडील वेगवेगळ्या गर्भगृहात विराजमान आहेत. भगवान गणेश, भगवान सुब्रमण्यम त्यांच्या पत्नी वल्ली आणि देवसेना, चंडिकेश्वर, नटराज आणि नंदी यांच्यासह मंदिराच्या मोठ्या प्रांगणात विराजमान आहेत. दर सोमवारी भाविक भक्त हे हृदयरोगापासून मुक्ती मिळावी म्हणून या मंदिरात प्रार्थना करतात. हे मंदिर तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात आहे. श्रद्धेने आणि भक्तीभावाने पूजा केल्यास आजार बरे होतात असे ते म्हणाले.

हृदयालीश्वर मंदिराची ती अनोखी कहाणी

हृदयालीश्वर मंदिराशी संबंधित मान्यतेनुसार, पूसलार नयनार नावाचा एक गरीब शिवभक्त होता. त्याचे एक मोठे दुःख होते की त्याला भगवान शिवाचे मंदिर बांधता आले नाही. मग त्याने हृदयातच शिवाचे मंदिर रचले. त्याने शंकराचा धावा केला. त्याचा ध्यास, भक्ती पाहुन भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी एक मंदिर तयार केले. या मंदिरात विधीनुसार, महादेवाच्या पिंडीची, शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. भगवान शंकर पुसलारच्या हृदयात सामावले असल्याने या मंदिराचे नाव हृदयालीश्वर असे पडले.

डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतानुसार ही माहिती देण्यात आली आहे. टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा