वैभव सूर्यवंशीला BCCI चं तातडीचं आवताण; विराट-रोहितची विकेट पडणार? तो मास्टर प्लॅन काय?
Vaibhav Suryavanshi BCCI Training : अवघ्या 14 व्या वर्षी 35 चेंडूत शतक ठोकणारा युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरिष्ठ खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी BCCI ने मोठे पाऊल टाकले आहे.

वैभव सूर्यवंशीने सध्या अनेक तरुणांना क्रिकेटचे वेड लावलं आहे. या उदयोन्मुख खेळाडूने वयाच्या 14 व्या वर्षीच दमदार कामगिरी करुन दाखवली. वघ्या 14 व्या वर्षी 35 चेंडूत शतक ठोकणारा युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याने कमी वयात जी कमाल दाखवली त्याचे ‘वैभव’ क्रिकेट जगाताने पाहिले. त्याच्या दमदार फटकेबाजीने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्याच्या खेळाचे भारतातच नाही तर परदेशातही मोठे कौतुक झाले.
गोरे साहेब पण चकीत
IPL मध्ये तुफानी खेळी खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या भूमीवर पण धुमाकूळ घातला. त्याची खेळी पाहुन गोरे साहेब पण चमकले. अनेकांनी हा भारताचा स्टार फलंदाज ठरेल असा दावा केला आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यातच वैभव इंग्लंड दौऱ्यावरून घरी टेकतो ना टेकतो तर त्याला BCCI ने फोन केला. तेव्हापासून 10 ऑगस्टपासून तो बंगळुरू येथील NCA मध्ये घाम गाळत आहे. बीसीसीआयकडून फोन येण्यापूर्वी त्याने राजस्थान रॉयल्ससोबत विशेष प्रशिक्षण घेतले.
वैभव घेणार वरिष्ठ क्रिकेटपटूंची जागा
मायखेलच्या एका दाव्यानुसार, वैभव सूर्यवंशी सारख्या अनेक मोत्यांना आता चमकण्याची संधी दिली जाणार आहे. बीसीसीआयने त्यासाठीच त्यांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात तांत्रिक कवायतींसोबत, सामन्यांमध्ये केव्हा काय परिस्थिती येते. संकट उद्धभवते, तेव्हा खेळाडूंची मानसिक स्थिती कशी असावी, त्याने काय करावे याचे बारीक सारीक प्रशिक्षण देणार आहे.
बीसीसीआय तरुणांना वरिष्ठ खेळाडूंच्या होणाऱ्या रिक्त जागांसाठी तयार करत आहे. वरिष्ठ खेळाडू हे हळूहळू निवृत्त होत आहे. त्या रिक्त जागा भरण्यासाठी उदयोन्मुख खेळाडुंना आता प्रशिक्षण देण्यात येत आहे. वैभवसाठी ती प्रक्रिया सुरू झाली आहे. खास खेळाडूंना निवडण्यात येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आव्हानांनुसार त्यांना तयार करण्यात येते. नवीन दमाचे आणि रक्ताचे खेळाडू हा कोणत्या संघाच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे वैभव सूर्यवंशीचे लहानपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी स्पष्ट केले.
रोहित-विराट निवृत्त होणार?
यंदा विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटीतून निवृत्ती स्वीकारली. 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची त्यांची इच्छा आहे. पण त्यासाठी तंदुरुस्त असण्याची गरज आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) एका अधिकाऱ्यानुसार, आगामी ऑस्ट्रेलिा दौऱ्यात एक दिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसतील. पण कदाचित ही त्यांची अखेरची एकदिवसीय मालिक असू शकते. ते निवृत्तीची घोषणा करू शकतात. बीसीसीआय आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाचे सध्याचे लक्ष आशिया कप आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर आहे. वैभव बंगळुरूमधील सराव आटोपून भारताच्या 19 वर्षांखालील शिबिरात दाखल होईल.
