Ganesh Jayanti 2022 | आज गणेश जयंतीला हे उपाय करा, आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील

| Updated on: Feb 04, 2022 | 6:00 AM

हिंदू (Hindu)धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे . पुराणात माघ (Magh) महिना मोक्षाचा महिना मानला गेला आहे. या महिन्यात गंगा-यमुना इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे मानले जाते. माघ महिन्यात गणपतीला समर्पित दोन अत्यंत महत्त्वाचे व्रत पाळले जातात.

Ganesh Jayanti 2022 | आज गणेश जयंतीला हे उपाय करा, आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील
Ganesh chaturti
Follow us on

मुंबई : हिंदू (Hindu)धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे . पुराणात माघ (Magh) महिना मोक्षाचा महिना मानला गेला आहे. या महिन्यात गंगा-यमुना इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे मानले जाते. माघ महिन्यात गणपतीला समर्पित दोन अत्यंत महत्त्वाचे व्रत पाळले जातात. एक म्हणजे सकट चौथ 2022 आणि दुसरी गणेश जयंती, जी प्रामुख्याने भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये साजरी केली जाते. सकट चौथचे व्रत सर्व दु:ख आणि संकटे दूर करण्यासाठी साजरे केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, श्री गणेश ( Ganesh) यांचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता, जी आता गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची जन्मकथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हणतात.

चंद्रदर्शन का करु नये?
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शनाबाबत एक कथा आहे. त्यानुसार, जेव्हा गणपतीला हत्तीचे शीर बसवण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यानंतर ते प्रथम पूजनीय म्हटले गेले. तेव्हा त्यांचे सर्व देव आणि देवींनी पूजा केली. पण चंद्रदेवाने तसे केले नाही, कारण त्यांना त्यांच्या सुंदरतेचा अभिमान होता. जेव्हा गणपतीने चंद्रदेवाचा हा अभिमान पाहिला तेव्हा त्यांना राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तू काळा होशील. त्या दिवसापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहीला जात नाही.

बाप्पाला प्रसन्न करण्यासाटी या मंत्रांचा जप करा –

  • ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात..
  • ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश. ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश..
    दीर्घायुष्यासाठी
    नारद उवाच, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्,
  • भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थ सिद्धये.
  • विशेष इच्छा पूर्तीसाठी
    ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश

विनायक चतुर्थी पूजेची पद्धत
? विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.

? या दिवशी पूजास्थळ स्वच्छ करुन गंगाजल शिंपडा. आपण मंदिरात पूजा देखील करु शकता.

? गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करा .

? त्यानंतर गणपतीला लाल कुंकू, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा.

? गणेशाला मोदकाचे नैवेद्य दाखवा.

? यानंतर गणेश पाठाचे पठण करा आणि नंतर आरती करावी.

विनायक चतुर्थीचे महत्व काय?
भगवान गणेशाला शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि भरभराटीचे देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते, स्वत:चा आत्मसन्मान प्रिय असेल तर या 5 ठिकाणी अजिबात राहू नका

03 February 2022 Panchang | 3 फेब्रुवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ganesh Chaturthi 2022 | विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे पूजा होणार, जाणून घ्या माघ गणेश जयंतीचे महत्त्व पूजेची पद्धत