AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan : दिवसाच होणार रात्र… काळाकुट्ट अंधार, त्या दिवशी काय होणार ? भारतावर परिणाम…

Longest Solar Eclipse 2027 : खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी 2027 हे वर्ष ऐतिहासिक ठरणार आहे. या वर्षी 2 ऑगस्ट रोजी होणारे सूर्यग्रहण ही एक सामान्य घटना नव्हे; या शतकातील हे सर्वात मोठं सूर्यग्रहण असल्याचे म्हटलं जात आहे. सहा मिनिटांपेक्षा जास्त काळ सूर्य चंद्रामागे पूर्णपणे झाकला जाईल, ज्यामुळे दिवसा रात्रीसारखं दृश्य असेल.

Surya Grahan : दिवसाच होणार रात्र... काळाकुट्ट अंधार, त्या दिवशी काय होणार ? भारतावर परिणाम...
सूर्यग्रहण
| Updated on: May 06, 2026 | 12:55 PM
Share

Solar Eclipse : 2 ऑगस्ट 2027 ला लागणं सूर्यग्रहण हे खगोलशास्त्राच्या जगातील एक अतिशय खास घटना मानली जात आहे. या दिवशी एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतील आणि काही क्षणांसाठी सूर्य पूर्णपणे झाकला जाईल. म्हणूनच हे 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण सूर्यग्रहणांपैकी एक मानले जाते. विशेष म्हणजे, याचा कालावधी अंदाजे 6 मिनिटे आणि 23 सेकंद असण्याची शक्यता आहे, सर्वसाधारण ग्रहणांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त काळ आहे.

कधी, किती वेळ असेल सूर्यग्रहण ?

पंचांगानुसार, 2027 सालचं हे सूर्यग्रहण 2 ऑगस्ट रोजी होणार असून, त्याचा एकूण कालावधी अंदाजे 6 मिनिटं आणि 23 सेकंद असेल. सामान्यतः खग्रास सूर्यग्रहण फक्त 2 ते 3 मिनिटं टिकते, परंतु हा वाढलेला कालावधी या शतकातील सर्वात मोठा मानला जात आहे.

कोणत्या देशात दिसणार ग्रहण ?

हे दुर्मिळ सूर्यग्रहण भारतात खंडग्रास स्वरूपात दिसेल, परंतु इजिप्त (लक्सर), सौदी अरेबिया (मक्का/जेद्दाह), येमेन, स्पेन, मोरोक्को आणि लिबियासह जगातील अनेक भागांमध्ये ते पूर्णपणे दिसेल. या भागांमध्ये दिवसा काही मिनिटांसाठी अंधार पडू शकतो, ज्यामुळे एक अनोखा अनुभव मिळेल. शास्त्रज्ञांनुसार, 1991 के 2114 दरम्यानचे हे सर्वात लांब खग्रास सूर्यग्रहण असेल. त्याचा दीर्घ कालावधी आणि ही एक दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना असल्यामुळे ते विशेष ठरतं. म्हणूनच जगभरातील शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रप्रेमी या घटनेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सूर्य ग्रहण म्हणजे काय ?

सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असून, हे तेव्हा घडतं जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो आणि त्यामुळे सूर्यप्रकाश अंशतः किंवा पूर्णपणे झाकतो. जेव्हा सूर्य पूर्णपणे झाकला जातो, तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात आणि जेव्हा फक्त मध्यभाग झाकला जातो व कडांभोवती प्रकाशाची एक वलय दिसते, तेव्हा त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

कशी घ्यावी काळजी ?

सूर्यग्रहण ही एक महत्त्वपूर्ण खगोलशास्त्रीय घटना आहे आणि ते पाहताना व पाहिल्यानंतर काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, संरक्षणाशिवाय कधीही थेट सूर्याकडे पाहू नका, कारण त्याच्या तीव्र किरणांमुळे दृष्टीचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. तसंच, ग्रहणाच्या वेळी स्वयंपाक न करण्याची किंवा अन्न न खाण्याची परंपरा पाळली जाते, कारण असा मानलं जात की, या वेळी वातावरणातील जंतूंची क्रियाशीलता वाढते, ज्यामुळे अन्न दूषित होऊ शकतं.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा