
आपले कोणतेही काम होईपर्यंत कोणालाही सांगू नये असं म्हटलं जातं अन्यथा काम होत नाही, नजर लागते असे म्हटले जाते. वाईट नजर लागणे ही मान्यता फक्त केवळ भारतातच नाही तर जगभरात मानली जाते. म्हणून, वाईट नजर किंवा नकारात्मक उर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी, आपण कित्येकदा “टच वुड” असं म्हणतो. कारण आपण जर एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल बोललो की लगेच “टच वुड” असं म्हणतो कारण तसे केल्याने आपल्या चांगल्या कामांना नजर लगात नाही असं मानलं जातं.
“टच वुड” का म्हणतात?
जेव्हा लोक तुमच्याशी त्यांच्या स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या यशाबद्दल, चांगल्या आरोग्याबद्दल, प्रगतीबद्दल बोलतात तेव्हा ते पटकन त्यांच्या जवळच्या लाकडी वस्तूला स्पर्श करतात आणि म्हणतात “टच वुड”. लाकडाला स्पर्श करून ‘टच वुड’ बोलण्याची ही प्रथा केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रचलित आहे, ज्याचा मुख्य उद्देश वाईट नजर किंवा दुर्दैव दूर करणे आहे.
पण लाकडाच्या वस्तूंना स्पर्श केल्याने खरोखरंच वाईट नजर दूर होते का? याला समर्थन देण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसले तरी, परंपरा, श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो.
‘टच वुड’ची प्राचीन परंपरा आणि श्रद्धा
लाकडी वस्तूला स्पर्श करून “टच वुड” म्हणण्यामागील मूळ कल्पना अशी आहे की लाकडात सकारात्मक ऊर्जा, स्थिरता आणि संरक्षण असते. असे मानले जाते की लाकडाला स्पर्श करून “टच वुड” म्हटल्याने सकारात्मक ऊर्जा आणि विश्वास जागृत होतो, ज्यामुळे लोकांची वाईट नजर लागत नाही. ही प्रथा निश्चितपणे सिद्ध करता येत नसली तरी, लाकडाला स्पर्श करून “टच वुड” म्हणणे हा वाईट नजरेपासून बचाव करण्याचा एक प्रतीकात्मक मार्ग मानला जातो.
‘टच वुड’ म्हणण्याची परंपरा कशी सुरू झाली?
सर्वात जुना आणि सर्वात लोकप्रिय सिद्धांत असा आहे की प्राचीन मूर्तिपूजक संस्कृतींचा असा विश्वास होता की झाडे आणि वनस्पतींमध्ये दुष्ट आत्मे आणि देवता राहतात. म्हणूनच, त्यांचा असा विश्वास होता की झाडांना स्पर्श करून ते दैवी शक्तीशी जोडले जात आहेत आणि दुष्ट आत्म्यांपासून त्यांचे सौरक्षण होत आहेत.
आणखी एक श्रद्धा ख्रिश्चन धर्माशी संबंधित आहे. ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या क्रूसीफिक्सन क्रॉसच्या लाकडाला पवित्र मानत होते. लाकडाला किंवा क्रॉसला स्पर्श करून, लोक देवाचे आशीर्वाद आणि दैवी संरक्षण अनुभवतात.
ज्योतिषशास्त्र काय म्हणते?
ज्योतिषशास्त्रानुसार लाकूड प्रामुख्याने गुरु आणि चंद्रासारख्या शुभ ग्रहांशी संबंधित आहे. जरी वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड इतर ग्रहांशी देखील संबंधित असले तरी, गुरु आणि चंद्र हे प्रामुख्याने लाकडाशी संबंधित ग्रह मानले जातात. गुरु ग्रह संरक्षण आणि सकारात्मकतेशी संबंधित आहे, तर चंद्र भावनिक स्थिरतेशी संबंधित आहे. म्हणून, लाकडाला स्पर्श करणे हा शुभ ग्रहांची ऊर्जा आवाहन करण्याचा आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्याचा एक प्रतीकात्मक मार्ग असतो असे म्हटले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)