तुमच्या घराला वाईट नजर लागली असेल तर ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर
घरात वारंवार अडचणी येताय त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत असतील तर हे नजरदोष असण्याची शक्यता असते. तर वास्तुशास्त्र या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत ते जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी वास्तु तत्वांचे पालन केल्याने त्यांचा चांगला परिणाम होत असतो. त्याचबरोबर सकारात्मक उर्जेचा प्रवाह टिकून राहण्यास मदत होते. असे मानले जाते की घराला वाईट नजर लागते तेव्हा त्यांचा खुप मोठा परिणाम घरातील व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. ज्यामुळे एखाद्याला डोकेदुखी, चक्कर येणे, चिडचिड, निद्रानाश आणि थकवा यासारख्या विविध शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. शिवाय, वाईट नजरेचे परिणाम एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनातही व्यत्यय आणू शकतात.तर यावर मात करण्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्रात सुचवलेले हे उपाय अवलंबू शकता. चला तर मग आजच्या लेखात या खास उपायांबद्दल जाणून घेऊयात..
साधे सोपे उपाय
वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी, तुम्ही हे वास्तु उपाय अवलंबू शकता. संध्याकाळी लवंग, कापूर, शेणाच्या गौऱ्या, पिवळी मोहरी आणि तमालपत्र घ्या. ज्या बाजारात तुम्हाला सहज मिळतील. तर हे सर्व साहित्य एका भांड्यात संध्याकाळच्या वेळेस सोयीस्कर पद्धतीने जाळा. नंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हा धूर पसरवा. काही दिवस हा उपाय केल्याने नकारात्मक उर्जेपासून आराम मिळू शकतो. यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते आणि संघर्षांपासून आराम मिळतो. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल देखील येतात. तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता, पण संध्याकाळी हा उपाय केल्यास तो जास्त प्रभावी ठरतो.
नकारात्मकता दूर होईल
जर तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक उर्जेचा त्रास होत असेल तर दररोज कापूर जाळा. याव्यतिरिक्त, नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही थोडे मीठ किंवा तुरटीच्या पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने फरशी पुसू शकता. हे सर्व केल्याने तुम्हाला नकारात्मक उर्जेपासून मुक्तता मिळू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवा
वास्तुनुसार , तुमचे फर्निचर नेहमी व्यवस्थितपणे व्यवस्थित ठेवा. तुमच्या घरात कधीही अनावश्यक वस्तू जमा करू नका, कारण या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. सकाळी खिडक्या उघडा जेणेकरून ताजी हवा आणि नैसर्गिक प्रकाश आत येईल. यामुळे वातावरणात सकारात्मकता टिकून राहते आणि वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
