AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुम्हाला किंवा तुमच्या घराला नजर लागली आहे हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सोपे उपाय

जर एखाद्या व्यक्तीला किंवा घराला नजर लागली तर त्यामध्ये अनेक नकरात्मक बदल दिसू लागतात, नजर लागने म्हणजे नेमकं काय? आणि ही समस्या कशी दूर करायची? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

Vastu Shastra : तुम्हाला किंवा तुमच्या घराला नजर लागली आहे हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सोपे उपाय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 5:36 PM
Share

असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीला किंवा घराला कोणाची नजर लागली तर त्यावेळी संबंधित व्यक्तीमध्ये काही बदल दिसू लागतात जसं की, शारीरिक आणि मानसिक समस्या, अचानक तीव्र डोके दुखी, चक्कर येणं, स्वभाव चिडचिडा होणं, झोप न येणं, थकवा जाणवणं, असे अनेक लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. नजर फक्त व्यक्तीलाच लागते असं नाही तर घराला देखील लागू शकते, जर घराला नजर लागली तर अचानक व्यापारामध्ये मोठं नुकसान होणं, आर्थिक समस्या निर्माण होणं, घरात कायम वादविवाद भांडणं होणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात, नजर लागली तर त्यावर काय उपाय करावेत? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे, ती आज आपण जाणून घेणार आहोत.

अशी दूर करा नजर

जर तुम्हाला किंवा घराला कोणाची नजर लागली असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही सोपे उपाय करू शकता. सायंकाळच्या वेळी काही लवंगा, कापूर आणि एक शेणाची गवरी घ्या, तसेच मोहरीचं तेल देखील सोबत घ्या, या गवरीवर मोहरीचं तेल टाकून ती गवरी पेटवा, त्यामध्ये कापूर आणि लवंगा टाका आणि त्याचा जो धूर होईल, तो संपूर्ण घरात फिरवा. वास्तुशास्त्रानुसार असा उपाय केल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होतं. जर तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल तर त्याचं मुख्य लक्षण असतं, की घरामध्ये सतत भांडणं होतात, कारण नसताना वादविवाद होतात, मात्र तुम्ही जर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, घर स्थिर आणि शांत राहील.

अशी दूर करा घरातील नकारात्मक ऊर्जा

जर तुमच्याही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, घरामध्ये सतत भांडणं होत राहतात, कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकांसोबत पटत नाही? आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत? तर त्यामागे वास्तुदोष असू शकतो, असा वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरातील देवघरासमोर एक कापूर लावा, दररोज कापूर लावल्यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुम्हाला त्याचा अपेक्षित प्रभाव देखील पहायला मिळतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार झाली असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात, मात्र छोट्या-छोट्या उपायांद्वारे आपण घरातील वास्तुदोष नष्ट करू शकतो, जसं की घर कायम स्वच्छ ठेवा, उत्तरेला लक्ष्मी माता किंवा कुबेराचा फोटो ठेवा, यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होणार नाहीत. तुमच्या देवघराचं द्वार हे नेहमी पूर्वेला किंवा पश्चिमेला ठेवा, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार